Bhimashankar Temple: ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला भीमाशंकर; तिसऱ्या श्रावणी सोमवारी लाखो भाविकांची गर्दी

दाट धुके, पाऊस आणि थंडीची पर्वा न करता भाविकांची दर्शनासाठी रांग; मान्यवरांनी घेतले ज्योतिर्लिंगाचे दर्शन
Bhimashankar Temple Darshan
Bhimashankar Temple DarshanPudhari
Published on
Updated on

भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे पवित्र शिवलिंगाची महापूजा व आरती झाली. ‘हर हर महादेव’ आणि ‘भीमाशंकर महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंदिर व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

Bhimashankar Temple Darshan
Narayangaon Ganesh Idol Prices: गणेशमूर्तींच्या किमतीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ; नारायणगावात बाप्पाच्या आगमनाची लगबग

भीमाशंकर हे धार्मिक तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ असल्याने दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येथे येतात. शनिवार, रविवार आणि श्रावण सोमवार या दिवशी गर्दीत लक्षणीय वाढ होत आहे. दाट धुके, बोचरी थंडी, अधूनमधून पडणारा पाऊस आणि ऊन अशा वातावरणातही भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मंदिर परिसरातील मुखदर्शन रांग आणि पास सुविधेमुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले.

Bhimashankar Temple Darshan
Kalyan Latur Highway: ‘शेती वाचवा, जुन्नर वाचवा’; कल्याण-लातूर महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पहाटे आरती, महापुजेनंतर विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनीही ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. मंचर येथील उद्योजक अनिल लबडे यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर व ज्योतिर्लिंगाची फुलांची आकर्षक सजावट करून दिली. दरम्यान, कोकणातून कर्जतमार्गे खांडज व गणपती घाटातून पायी येणाऱ्या भाविकांचा ओघही सुरू आहे.

Bhimashankar Temple Darshan
Maza Bappa 2026: विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘बाप्पा’; शाडू मातीच्या मूर्तींतून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

भाविकांना मंदिर परिसरात व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, गोरक्षनाथ कौदरे व व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था करण्यात आली होती. वाहनतळ क्रमांक चार व पाच तसेच मंदिर परिसरात यात्रा काळात प्रशासन व पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Bhimashankar Temple Darshan
DJ Noise: उत्सवाचा आनंद घ्या; पण दुसऱ्याच्या शांततेची किंमत मोजून नव्हे!

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत विधिवत पूजा व अभिषेक केला. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news