Bhimashankar Temple Darshan Open: भीमाशंकर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले; पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी

ऑनलाइन नोंदणीमुळे दर्शन व्यवस्था शिस्तबद्ध; हजारो भाविकांनी घेतले दर्शन
Bhimashankar Temple Darshan
Bhimashankar Temple DarshanPudhari
Published on
Updated on

मंचर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी (दि. १५) भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिर सुरू होताच पहिल्याच दिवशी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची उत्साहपूर्ण गर्दी झाली. ऑनलाइन नोंदणी केलेल्या एक हजार भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले, तर नोंदणी नसल्याने सुमारे ७०० ते ८०० भाविकांसह काही राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले. सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभारणी, पायरी मार्ग सुधारणा आणि विविध विकासकामे सुरू आहेत.

Bhimashankar Temple Darshan
Jejuri Somvati Yatra 2026: जेजुरी सोमवती यात्रेला ३ लाखांहून अधिक भाविकांची गर्दी; भक्तिभावात न्हालं गड

या कामांसाठी ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. जवळपास एक वर्ष लागण्याचा अंदाज असलेले सभामंडपाचे काम अवघ्या पाच महिन्यांत अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सोमवारी सकाळी ५ वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर आरती पार पडली. त्यानंतर सकाळी ७ ते ११ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. वाहनतळ क्रमांक २ आणि ४ येथे ऑनलाइन नोंदणीची पडताळणी करूनच भाविकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

Bhimashankar Temple Darshan
Nira Farmer Crisis: निरा परिसरात पावसाची दडी; खरिपाच्या पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत

१५ जून ते ३० जून या कालावधीत दररोज केवळ एक हजार भाविकांना दर्शनाची संधी देण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन नोंदणी https:///shreebhima shankar.com या संकेतस्थळावर बंधनकारक करण्यात आली आहे. ५ जूनपासून नोंदणीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, २६ जूनपर्यंतची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. वाहनतळापासून मंदिरापर्यंत सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतर पायी जावे लागत असल्याने भाविकांनी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय होत असल्याचे भाविकांनी सांगितले.

Bhimashankar Temple Darshan
Saswad CCTV Security System Demand: सासवडमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी; सुरक्षा आणि गुन्हे नियंत्रणासाठी नागरिक आग्रही

दरम्यान, नोंदणीचा नियम सर्वांसाठी समान लागू करण्यात आल्याने काही ठिकाणी नोंदणी नसलेल्या व्यक्ती आणि संबंधित यंत्रणांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळाली. देवस्थान ट्रस्ट, पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी समन्वयाने गर्दी व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. सध्या सभामंडपावरील घुमट, तसेच पायरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मंदिर सर्व भाविकांसाठी निर्बंधमुक्त खुले करण्यात येणार आहे.

Bhimashankar Temple Darshan
Pune Center Head Recruitment 2026: केंद्रप्रमुख भरतीला गती; पुणे जिल्ह्यात १५१ नव्या पदांना मंजुरी

दर्शनासाठी सर्वांसाठी एकच नियम लागू आहे. व्हीआयपी, लोकप्रतिनिधी, अधिकारी किंवा सामान्य भाविक असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.

सुरेश कौदरे, अध्यक्ष, देवस्थान ट्रस्ट

मंदिर परिसरात सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नोंदणी नसलेल्या व्यक्तींनी गर्दी टाळून सहकार्य करावे."

सागर पवार, सहायक पोलिस निरीक्षक, घोडेगाव पोलिस ठाणे

पाच महिन्यांनंतर भगवान भीमाशंकरांचे दर्शन घेण्याचा योग आला. ऑनलाइन नोंदणीमुळे व्यवस्था शिस्तबद्ध झाली आहे. मात्र, वाहनतळापासून मंदिरापर्यंत चालत जावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करावी.

रमेश येवले, उद्योजक, पुणे-गंगापूर, विकास बेंगडे, भाविक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news