Bhimashankar Temple Closure Impact: भीमाशंकर मंदिर बंदचा फटका; करवंद विक्री करणाऱ्या आदिवासी मुलांची चिंता वाढली

विकासकामांमुळे भाविकांची वर्दळ घटली; करवंद विक्री ठप्प झाल्याने शिक्षण व घरखर्चावर परिणाम
Bhimashankar Temple Closure Impact
Bhimashankar Temple Closure ImpactPudhari
Published on
Updated on

मंचर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिर विकासकामांमुळे बंद असल्याने भाविक व पर्यटकांची वर्दळ थांबली आहे. त्याचा थेट फटका करवंद विक्री करणाऱ्या आदिवासी शाळकरी मुलांना बसत आहे.

Bhimashankar Temple Closure Impact
Maharashtra Sugar Mill FRP Payment Delay: साखर कारखान्यांकडे 1303 कोटींची एफआरपी थकीत; शेतकऱ्यांचा संताप वाढला

मे महिन्याच्या सुट्या सुरू होताच आहुपे, तळेघर, श्री भीमाशंकर परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये करवंद तोडणीला वेग येतो. पहाटेपासून लहान मुले जंगलात जाऊन करवंदे गोळा करतात. त्यानंतर पळसाच्या पानांच्या द्रोणात भरून ती भीमाशंकर मार्गावरील रस्ते, बसस्थानके व पर्यटनस्थळी विक्रीसाठी बसतात.

Bhimashankar Temple Closure Impact
Pune Hoarding Rate Increase: पुण्यात होर्डिंग दरात मोठी वाढ; प्रति चौ.फुट 750 रुपयांपर्यंत प्रस्ताव

दरवर्षी भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे या मुलांची चांगली कमाई होत असते. मिळालेल्या पैशातून शालेय साहित्य, कपडे तसेच घरखर्चासाठी मदत केली जाते. मात्र, यंदा मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मंदिर बंद असल्याने भाविकांची संख्या घटली आहे. परिणामी करवंद विक्री ठप्प झाली असून, मुलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे.

Bhimashankar Temple Closure Impact
Pune Equal Development Funds: पुणे महापालिकेत समान निधी वाटपाची मागणी; सुनेत्रा पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

करवंद घ्या... गोड करवंद घ्या... अशी हाक देणारी ही मुले आता तासन्‌‍ तास ग््रााहकांच्या प्रतीक्षेत बसलेली दिसत आहेत. स्थानिक ग््राामस्थांनी प्रशासनाने विकासकामांसोबत पर्यटकांची ये-जा सुरळीत ठेवावी, अशी मागणी केली आहे.

Bhimashankar Temple Closure Impact
Pune Nashik Highway Toll System: पुणे-नाशिक महामार्गावर टोल प्रणालीत मोठा बदल; ऑगस्टपासून बॅरियर-लेस व्यवस्था

दरवर्षी मे महिन्यात करवंद विक्रीतून मुलांना चांगला पैसा मिळतो. यंदा मंदिर बंद असल्याने पर्यटकच नाहीत. मुलांची करवंदे तशीच पडून राहत असून, त्यांच्या शिक्षण खर्चावरही परिणाम होत आहे.

गणेशभाऊ कोकणे, उद्योजक महाळुंगे-सुपेधर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news