पुणे : गेल्या काही वर्षांत शहरातील वायू प्रदुषणामुळे होणार्या आजारांत मोठी वाढ झाली आहे. हवा खराब गटांत असेल अन् तुम्ही त्या रस्त्याने गेलात तर कान, नाक, घसा या भागात ते प्रथम जाते. त्यामुळे घसा खवखवणे, नाकातून स्राव गळणे, त्वचेवर लालसर पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात. मात्र, हे आजार लवकर बरे होत नाहीत. पुण्यात या तक्रारींचे प्रमाण वाढले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
वातावरणातील अनेक प्रदूषकांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो, मात्र तो लगेच दिसत नाही.
कारण प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. त्याप्रमाणे शरीर ते सहन करते. मात्र, काही जणांना त्याचा लगेच त्रास होतो. ज्यांना श्वासाचा त्रास होतो त्यांना वातावरणातील बदल लगेच कळू लागतो. हल्ली शहरात कान, नाक घसा याविषयी प्रदूषणामुळे अनेक त्रास झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रामुख्याने जे लोक दररोज दुचाकीवरून लांबचा प्रवास करतात त्यांना या तक्रारी जास्त आहेत. कारण त्यांच्या नाकात, घशात सर्वाधिक प्रदूषित घटक वातावरणातून जातात. हेल्मेट किंवा मास्क घातलेला नसेल तर या प्रदूषित घटकांचा परिणाम होत आहे.
एका खासगी वैद्यकीय संस्थेने भारतातील दिल्ली, मुंबई, पुणे व अहमदाबाद या चार वाहन प्रदूषणात आघाडीवर असणार्या शहरांचा अभ्यास केला असता, असे लक्षात आले की, धूलिकणांचे प्रमाण पावसाळा संपताच वाढू लागते. कारण आकाश निरभ— होते, वार्याचा वेग वाढतो. त्यामुळे धूलिकणांचा प्रवास वेगाने वाढतो. उन्हाळ्यात हे प्रदूषण अधिक वेगाने वाढते.

हेही वाचा