BARTI PhD Fellowship Delay Notice: बार्टीच्या फेलोशिप विलंबावर आयोगाचा चाबूक; 30 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

2023 पीएचडी विद्यार्थ्यांना लाभ नाकारल्याचा आरोप; घटनात्मक अधिकारांतर्गत नोटीस जारी
Notice
NoticePudhari
Published on
Updated on

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी 2023 च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 338 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करीत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून, 30 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Notice
Maharashtra Registration Department New Structure: नोंदणी-मुद्रांक विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; पदसंख्या 3952च्या वर

सारथी आणि महाज्योती यांसारख्या इतर स्वायत्त संस्थांनी 2023 च्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली आहे. मात्र, बार्टीने 30 ऑक्टोबर 2023 च्या ‌‘समान निकष‌’ धोरणाचा चुकीचा आधार घेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवले आहे. हा संविधानातील कलम 14 (समानतेचा अधिकार) चा उघड भंग असून, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आयोगाकडे करण्यात आली होती.

Notice
Pune Urea Fertilizer License Suspension: युरिया साठ्यात गोंधळ; पुण्यात 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संशोधक विद्यार्थी ऋषिकेश अशोक कांबळे यांच्या पुढाकाराने ही याचिका आयोगासमोर दाखल केली होती. आयोगाचे संचालक डॉ. जी. सुनीलकुमार बाबू यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, जर 30 दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर आयोग संविधानाने दिलेल्या दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करून महासंचालकांना वैयक्तिकरीत्या समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश देईल.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:

  • बार्टीने 2023 ची फेलोशिप जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करावी.

  • पात्र सर्व (100 टक्के) विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती लागू करावी.

  • ‘समान निकष‌’ धोरणाची अंमलबजावणी करताना जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news