Pune Urea Fertilizer License Suspension: युरिया साठ्यात गोंधळ; पुण्यात 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

पॉस प्रणालीत तफावत उघड; शेतकऱ्यांना निलंबित विक्रेत्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
License Suspension
License SuspensionPudhari
Published on
Updated on

पुणे: पॉस मशिन प्रणालीद्वारे प्रत्यक्षात युरियाची विक्री करूनही साठा अद्ययावत न करता तो जुनाच ठेवल्याने माहिती मिळण्यात तफावत दिसून आली. त्यामुळे अद्ययावत युरिया खतांचा साठा न केल्यामुळे पुणे जिल्ह्यातील 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

License Suspension
Narayangaon Truck Accident: नारायणगाव बाह्यवळणावर ट्रकची धडक; 7 मेंढ्या ठार, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

त्यामुळे संबंधित विक्रेत्यांना निलंबन कालावधीत सर्व प्रकारच्या खत विक्रीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निलंबित केलेल्या विक्रेत्यांकडून खते न घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

License Suspension
Maharashtra Marathi Language Mandatory Schools: मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर गंडांतर; 3 महिन्यांत मान्यता रद्द प्रक्रिया

जिल्ह्यातील युरिया खतपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून जिल्ह्यातील विक्रेत्यांची दिनांक 1 एप्रिलपासून युरिया खताचा पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्षात विक्री केंद्रातील साठा, याची तपासणीची मोहीम कृषी विभागाने हाती घेतलेली आहे. या मोहिमेमध्ये सुमारे 3,500 मेट्रिक टन युरिया खताचा साठा पॉस प्रणालीवर जो उपलब्ध नव्हता, तो कमी करण्यात आलेला आहे.

License Suspension
Ellora Caves Digital Reconstruction: वेरूळ लेणींची डिजिटल पुनर्रचना; 1300 वर्षांनंतर शिल्पे ‘बोलकी’

यामुळे खरीप हंगामात खताची वस्तुनिष्ठ उपलब्धता व पुरवठा नियोजन करण्यास जिल्हा कार्यालयास मदत होणार आहे. तसेच, निविष्ठा विक्रेत्यांना वेळोवेळी संधी देऊनही वेळेत कार्यवाही न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी कळविले आहे.

License Suspension
Pune BJP Corporators Dispute Resolved: भाजप नगरसेविकांमधील वाद मिटला; बिडकरांची मध्यस्थी यशस्वी

परवाने निलंबित झालेली तालुकानिहाय कृषी सेवा केंद्र

अदिती कृषी सेवा केंद्र-लिंगाळी, बळीराजा ॲग्रो एजन्सी-देऊळगाव राजे, शिवकृपा ॲग्रो एजन्सी-पिंपळगाव, नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस-नंदादेवी, बिरोबा कृषी सेवा केंद्र-बिरोबा वाडी, श्रीराम कृषी भंडार-हिंगणी बेर्डे, श्रीनाथ ॲग्रो सर्व्हिसेस-राहू. इंदापूर : महेश फर्टिलायझर-आगोती नंबर 1, गणेश ॲग्रो एजन्सी-कळस. शिरूर : विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र-मांडवगण फराटा. जुन्नर : विघ्नहर कृषी सेवा केंद्र-नारायणगाव, कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी-जुन्नर. भोर : श्री भैरवनाथ शेती भांडार, वेळू. आंबेगाव : शेतकरीराजा कृषी उद्योग-गावडेवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news