पुणे: चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून जेजुरी गडाची पाहणी

पुणे: चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून जेजुरी गडाची पाहणी

जेजुरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: जेजुरीच्या श्री खंडोबादेवाच्या सोमवती यात्रेदिवशी भाविकांची झालेली प्रचंड गर्दी व रिमझिम पावसामुळे पालखी सोहळ्यात चेंगराचेंगरी होऊन पाच जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर घटनेची माहिती व पुढील यात्रांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे व पोलिस अधिकाऱ्यांनी जेजुरी गडावर जाऊन माहिती घेतली.

या वेळी बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, भोर विभागाचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, जेजुरीचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, पर्यवेक्षक गणेश डिखळे, जेजुरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्ण कुदळे, पुजारी सेवकवर्गाचे गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, घडशी समाजाचे मानकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

चेंगराचेंगरीसारखी आपत्ती टाळण्यासाठी जेजुरी गडावरून पालखी सोहळा मार्गस्थ होताना पायरी मार्ग मोकळे करावेत, पालखी सोहळा नंदी चौकात येईपर्यंत भाविकांना पायरी मार्गावर प्रवेश देऊ नये, पालखी सोहळ्यातील मानकरी, खांदेकरी यांना ड्रेस कोड असावा, गडाच्या सज्जावरून पोत्यामधून भंडार उधळण्यास मज्जाव करावा आदी सूचना या वेळी करण्यात आल्या. तसेच यात्रेच्या दिवशी रहदारी नियंत्रित व्हावी, यासाठी एसटी बसस्थानकात न जाता बाहेरच थांबे निर्माण करणे सारख्या उपाययोजना करण्यात येतील. तसेच यात्रेपूर्वी ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना घेतल्या जातील, असे या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news