पुणे : सर्व डायलिसिस मशीन सुरू करण्याची महापालिकेकडून तंबी | पुढारी

पुणे : सर्व डायलिसिस मशीन सुरू करण्याची महापालिकेकडून तंबी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटर लायन्स क्लबला चालवण्यास देण्यात आली आहेत. सेंटरमधील 15 डायलिसिस मशीनपैकी 10 बंद आहेत. केवळ पाच मशीन सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत महापालिकेने लायन्स क्लबला नोटीस बजावली आहे. पुढील 15 दिवसांमध्ये सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न केल्यास करार रद्द करणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. महापालिकेतील कमला नेहरू रुग्णालयात 15 डायलिसिस मशीन आहेत. लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सेंटर चालवले जात आहे.

सेंटरमधील 10 मशीन अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी विलंब होत होता. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने 20 जून रोजी लायन्स क्लबला नोटीस पाठवली. त्यानंतर केवळ 3 मशीन कार्यान्वित करण्यात आली. उर्वरित मशीन 15 दिवसांमध्ये सुरू न केल्यास करार रद्द केला जाणार आहे. आरोग्य विभागातर्फे लायन्स संस्थेला कमला नेहरू रुग्णालयातील सेंटर 2016 मध्ये चालविण्यास देण्यात आले. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर पुन्हा पाच वर्षे कालावधी वाढवून देण्यात आला. महापालिकेचा एका डायलिसिसचा दर 400 रुपये आहे. सरकारी दर 1200 रुपये असल्याने लायन्स क्लबला 400 रुपयांत उपचार देणे अवघड वाटल्याने सेंटर सातत्याने बंद ठेवण्यात येत होते. याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे संबंधित प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा :

HBD Naseeruddin Shah : जेव्हा नसिरुद्दीन शाह यांनी साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

पिता न तू वैरी ! मुलासाठी जुळ्या मुलींचा खून

Back to top button