Traffic Police Action: बारामतीत वाहतूक शाखेचा दणका; हायवा, टिपरसह 153 अवजड वाहनांवर कारवाई

ही मोहीम दिनांक 27 जुलै ते 9 सप्टेंबर या कालावधीत चालविण्यात आली
Traffic police
हायवा, टिपरसह 153 अवजड वाहनांवर कारवाईPudhari
Published on
Updated on

बारामती : शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता, यांचा विचार करून बारामती वाहतूक शाखा अवजड वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. ही मोहीम दिनांक 27 जुलै ते 9 सप्टेंबर या कालावधीत चालविण्यात आली. या कारवाईत हायवा, टिपरसह 153 अवजड वाहनांवर कारवाई करीत 1 लाख 58 हजारांचा दंड करण्यात आला. (Pune News Update)

महिनाभरापूर्वी क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणार्‍या वाहनांवर केलेल्या कारवाईनंतर डंपर, टिपर, काँक्रीट मिक्सर, मल्टिएक्सेल ट्रक, खासगी बस अशा अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमभंग करणारी अनेक वाहने आढळली. त्यामध्ये काही टिपर वाहने ताब्यात घेऊन थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आली. जोपर्यंत दंड भरला जात नाही किंवा कागदपत्रे सादर केली जात नाहीत तोपर्यंत ती वाहने मुक्त करण्यात आलेली नाहीत.

Traffic police
Guava Price Crash: मातीमोल भावामुळे पेरू उत्पादक संकटात किलोचा भाव 15 रुपये

वाहतूक शाखेच्या पथकाने परवाना जवळ नसणे, नो-एन्ट्री झोनमध्ये प्रवेश करणे, वाहन धोकादायक स्थितीत चालविणे, वाहन विमा नसणे, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र नसणे, फॅन्सी नंबरप्लेट लावणे आदी नियमभंग करणार्‍या वाहनांवर कारवाई केली. या मोहिमेत तब्बल 153 वाहनांवर कारवाई करून 1 लाख 58 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Traffic police
Wild Boar Hunting: बोरावळेत रानडुकराची शिकार; 7 जण ताब्यात

पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक सुभाष काळे, कर्मचारी प्रदीप काळे, अजिंक्य कदम, दत्तात्रय भोसले, आकाश कांबळे, प्रज्योत चव्हाण यांनी ही कारवाई केली.

वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न बेशिस्त वाहतुकीस शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बारामती शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक शाखेने अनेक योजनांची आखणी केली आहे. आवश्यकतेनुसार विविध उपक्रम राबविले आहेत. व्याख्याने व शिबिरांमधून वाहनचालकांना मार्गदर्शन केले आहे. टुकार वाहनचालकांना धडा शिकविण्यासाठी अनेकवेळा धाडसी कारवाया करण्यात आल्या आहेत.वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे. नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहन चालविताना सर्व कागदपत्रे जवळ बाळगा आणि सुरक्षितता पाळा.

- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news