

वेल्हे: बोरावळे (ता. राजगड) येथे रानडुकराची शिकार करून काही जण त्याच्या मांसाचे वाटे करत आहेत, अशी गुप्त माहिती वेल्हे वन विभागाला मिळली. त्यानुसार अधिकार्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी मिळालेली माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सात जणांना मांस आणि हत्यारांसह ताब्यात घेतले आहे. (Latest Pune News)
संतोष बबन तळेकर (वय 45), गुलाब बबन शिंदे (वय 40 दोघे रा. बोरावळे, ता. राजगड), बबलू शंकर बांदल (वय 40), शांताराम कृष्णा खुटवड (वय 59, दोघेही रा. निगडे बु.), सहदेव विलास लिम्हण (वय 37), राजाराम सदाशिव शिर्के (वय 52, दोघेही रा. पारवडी), शंकर बबन गोर्हे (वय 45) यांना वन विभागाने मांस व हत्यारांसह ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींवर वन्यजीव अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र तसेच दाखलपात्र स्वरुपाचा आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी मिळालेल्या माहितीनुसार सहकार्यांसह बोरावळे येथील टाकवस्ती येथील संतोष बबन तळेकर यांच्या घरावर
धाड मारली. या वेळी तेथे रानडुकराची शिकार करून त्याच्या मांसांचे वाटे करताना वरील सात जण आढळून आले. याप्रकरणी वेल्हे वनविभाग आरोपींनी यापूर्वी शिकार केली आहे का, प्राण्यांच्या अवयवाची तस्करी केली का याची चौकशी करणार आहे.
ही कारवाई पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), भोर यांचे मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वन परिमंडळ अधिकारी दया डोमे, वन परिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुन, वनपरिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे, वन परिमंडळ अधिकारी मंजुषा घुगे, वनरक्षक ए. आर. सोनकांबळे, वनरक्षक एस. एन. कांबळे, वनरक्षक वाय. बी. टिकोळे, वनरक्षक सुनील होलगिर, वनरक्षक निखील रासकर, वनरक्षक एस. के. भैलुमे, वनरक्षक बी. एल. जगताप, वनरक्षक राजेंद्र निंभोरे, वनरक्षक स्वप्निल उंबरकार, वनरक्षक अर्चना कोरके, वनरक्षक अमोल गायकवाड, वनरक्षक संतोष रणसिंग तसेच वन परिक्षेत्र, वेल्हे यांच्या संयुक्त पथकाने केली.
वन्यजीवांची शिकार करणार्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शिकार रोखण्यासाठी तातडीने धडक मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या कामात कोणतीही हयगय केली जाणार नाही. -
अनिल लांडगे, वन परिक्षेत्र अधिकारी