Baramati Crime News: सोशल मीडियावरील व्हिडीओच्या वादातून तरुणावर हल्ला; दोघांना अटक

तांदूळवाडीत कार्यक्रमादरम्यानचा प्रकार, मुख्य आरोपींना पोलिस कोठडी
Social Media
Social MediaPudhari
Published on
Updated on

बारामती: शहरातील तांदूळवाडी येथे एका कार्यक्रमादरम्यान जेवण वाढत असताना काढलेले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या वादावरून 18 वर्षीय तरुणावर झालेल्या हल्लाप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तातडीची कारवाई करीत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

Social Media
Daund ZP Election: दौंड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदारांचे वारस रिंगणात

दि. 18 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता सार्थक लक्ष्मण अंबुरे (वय 18, रा. तांदूळवाडी) हा भैरवनाथ मंदिरात पालखीतील भाविकांसाठी जेवण वाढण्याचे काम करीत होता. या वेळी गावातील एकाने त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो डिलीट करण्यावरून वाद झाला. नंतर पप्पू शितोळेने त्याला काम असल्याचे सांगून मंदिराच्या मागील बाजूस नेले. तेथे आधीच गणेश सुभाष जाधव, अभिजित शेळके, अरुण जाधव व अन्य इसम उपस्थित होते. यानंतर सार्थकला शिवीगाळ करून जबरदस्तीने यश शितोळे यांच्या घराकडे नेण्यात आले. तेथे खाली पाडून गज आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या वेळी गणेश जाधव याने गचांडी धरून पिस्तूल काढत जिवे मारण्याची धमकी दिली, तर पप्पू शितोळे याने प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

Social Media
Bajaj Pune Grand Tour 2026: ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’मुळे पुणे जिल्ह्याची जागतिक ओळख : अजित पवार

मारहाणीत सार्थकच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. जिवाच्या भीतीने त्याने तत्काळ तक्रार दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी दुखापतीचा त्रास वाढल्यानंतर त्याने आईसह बारामती तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. गंभीर दुखापत केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तालुका पोलिसांनी तत्काळ पोलिस पथक पाठवून मुख्य आरोपी गणेश सुभाष जाधव (वय 34) व पप्पू शितोळे (वय 34, दोघेही रा. तांदूळवाडी) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Social Media
Katraj Ward Election Result: प्रभाग ३८ मध्ये भाजपचे वर्चस्व; व्यंकोजी खोपडे ठरले ‘जायंट किलर’

आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत. गणेश सुभाष जाधव याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालासुद्धा डोक्यात कोयता लागला होता, त्याच्या तक्रारीवरून आरोपी सार्थक अंभोरे, आकाश अंभोरे, बापू अंभोरे, पोपट अंभोरे, लखन अंभोरे यांच्याविरोधातही गंभीर मारहाणीसह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे.

Social Media
Pune Political Flex: ग्रँड सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील फ्लेक्स हटविण्याचे आदेश

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक युवराज पाटील, अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, दादा खराडे, आफिन शेख आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news