Bajaj Pune Grand Tour 2026: ‘बजाज पुणे ग्रँड टूर 2026’मुळे पुणे जिल्ह्याची जागतिक ओळख : अजित पवार

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे दर्जेदार रस्ते, पर्यटन व क्रीडा संस्कृतीला चालना
Bajaj Pune Grand Tour 2026
Bajaj Pune Grand Tour 2026Pudhari
Published on
Updated on

बारामती: ‌‘बजाज पुणे ग््राँड टूर 2026‌’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे देश-विदेशांतील नागरिकांना पुणे जिल्ह्याची ओळख होत असून, नामवंत खेळाडूंचे कौशल्य, स्पर्धेचा मार्ग, पायाभूत सुविधा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने परिसराची क्षमता अधोरेखित होत आहे. नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात खिलाडूवृत्ती व स्पर्धात्मकता वाढावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच, या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यात अडथळेविरहित व दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली असून, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Bajaj Pune Grand Tour 2026
Katraj Ward Election Result: प्रभाग ३८ मध्ये भाजपचे वर्चस्व; व्यंकोजी खोपडे ठरले ‘जायंट किलर’

‌‘बजाज पुणे ग््राँड टूर‌’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील विजेत्या सायकलपटूंना गुरुवारी (दि. 22) उपमुख्यमंत्री पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुनेत्रा पवार आदी मान्यवरांच्या हस्ते बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे पारितोषिक वितरण करून समारोप करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Bajaj Pune Grand Tour 2026
Pune Political Flex: ग्रँड सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील फ्लेक्स हटविण्याचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेऊन स्पर्धेचे सूक्ष्म नियोजन केले असून, नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत मोलाचे सहकार्य केले आहे. स्पर्धेच्या मार्गालगत ग््राामीण भागात नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी आदी घटक स्वयंशिस्त पाळून खेळाडू व त्यांचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी दुतर्फा उभे होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. अशा दर्जेदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Bajaj Pune Grand Tour 2026
Pune STP Projects: पुण्यात तीन नवे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू; २६ जानेवारीपासून ट्रायल रन

या स्पर्धेसाठी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून, स्पर्धेचे मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचे सायकलपटूंनीही व्यक्त केले. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे सायकलपटूंना विशेष ऊर्जा मिळत असल्याची भावना त्यांनी संवादादरम्यान व्यक्त केली, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Bajaj Pune Grand Tour 2026
Pune Municipal Recruitment Exam: महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद; दूरच्या केंद्रांमुळे उमेदवारांचे आंदोलन

बारामतीकरांकडून जल्लोषात स्वागत

केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे जिल्हा प्रशासन समन्वयाने कार्य करत असून बजाज, सीरम इन्स्टिट्यूट, पंचशील ग््रुाप यांसारख्या नामांकित कंपन्या, आरोग्य संस्था, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी ही स्पर्धा आपलीच मानून सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. बारामतीकरांनी या स्पर्धेचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी नागरिकांनी उभे राहत सायकलपटूंना प्रोत्साहन दिले.

दोन्ही राष्ट्रवादींबाबत दादांचे उत्तर ‌‘बघू आता‌’!

यावेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‌‘सायकल स्पर्धेचा आजचा चौथा दिवस होता. स्पर्धेचे चांगले नियोजन झाले. दरम्यान, निवडणुका जाहीर झाल्या. दावोसला जायचं असले तरी मुख्यमंत्री उद्घाटनाला आले. स्पर्धेदरम्यान लोकांनी चांगली शिस्त पाळली. या माध्यमातून रस्ते पण चांगले झाले. पुणेकरांना आम्ही चांगला प्रतिसाद देऊ, पण पुणेकरांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला नाही,‌’ असा टोला ही त्यांनी लगावला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहात... यासंदर्भात प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री पवारांनी ‌‘बघू आता‌’ असं म्हणत काढता पाय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news