Baramati Bribe Case: बारामतीत एसटी बँक संचालकाला ४ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

फर्निचर नूतनीकरणाच्या बिलासाठी मागितली होती ६ लाखांची लाच; एसीबीची कारवाई
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

बारामती: स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप बॅंक लि. मुंबई या बॅंकेच्या बारामती शाखेचे इमारत फर्निचर नूतनीकरणाच्या कामाचे बिल काढण्यापोटी सहा लाख रुपयांची लाच मागत त्यातील चार लाख रुपये स्वीकारताना बारामती एमआयडीसी एस.टी. आगाराचे वाहतूक नियंत्रक तथा एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अनिल तुकाराम बनकर (वय ५१, रा. पणदरे, ता. बारामती) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

Bribe Case
Veer Dam Water Release: वीर धरण १०० टक्के भरले; निरा नदीत २४ हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग

त्यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गुरुवारी (दि. २३) सायंकाळी बारामती एस.टी. स्टँड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

Bribe Case
Khadakwasla Dam Water Level: खडकवासला धरणसाखळी ‘ओव्हरफ्लो’च्या दिशेने; ८० टक्के पाणीसाठा, मुठा नदीत ९३७२ क्युसेक विसर्ग

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बारामती बसस्थानकात फर्निचर नूतनीकरणाचे काम घेतले होते. या कामाचे ४८ लाख ६० हजार रुपयांचे बिल मंजूर झाले होते. त्यापैकी ४० लाख रुपये मिळाले असून, ८ लाख ६० हजार ४५५ रुपये बाकी होते. तसेच, कामापोटी ४ लाख ९८ हजार रुपये मिळणे बाकी होते. बनकर हे बॅंकेचे संचालक असल्याने त्यांनी तक्रारदाराच्या कामाची ८ लाख ६० हजार रुपयांच्या रकमेची मंजूरी बॅंकेकडून घेतली.

Bribe Case
Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर अतिमुसळधार, दोन दिवस ऑरेंज अलर्ट

त्याची आॅर्डर आणत ती स्वतःजवळ ठेवली. ती बॅंकेत देण्यासाठी चार लाख रुपये आणि उर्वरित ४ लाख ९८ हजार रुपये मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये अशी पाच लाखांची लाच त्यांनी मागितली. आरोपीने तडजोडीअंती चार लाख रुपये तत्काळ स्वीकारण्याचे मान्य केले.

Bribe Case
Pune Hotel Waiters Struggle: ‘सर, आणखी काही हवं का?’ म्हणणाऱ्या हातांची कहाणी; हॉटेल वेटरच्या संघर्षाला मिळणार का सन्मान?

त्यानुसार गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास बारामती एस.टी. स्टँडसमोरील रस्त्यावर एमएच-४२ बीई-५७८७ क्रमांकाच्या वाहनात चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने बनकर याला रंगेहाथ पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. ही कारवाई पोलिस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news