Baramati Pawar Family Politics: बारामतीत पवार कुटुंबात 2029 उमेदवारीवरून वाद; ‘पवार विरुद्ध पवार’ चर्चा

जय पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय खळबळ; रोहित पवारांचा इशारा, वरिष्ठांचे संयमाचे आवाहन
Politics
PoliticsPudhari
Published on
Updated on

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर एकीकडे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच गुरुवारी (दि. 23) 2029चा उमेदवार कोण? यावरून बारामतीत पवार कुटुंबात चांगलीच जुगलबंदी होऊन राजकीय सुंदोपसुंदी रंगल्याचे पाहायला मिळाले.

Politics
Hadapsar Accident: हडपसरमध्ये घसरगुंडी पडून चिमुरडीचा मृत्यू; सोसायटी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

अजितदादा यांचे पुत्र जय यांनी हा विषय छेडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पुढील निवडणूक ‌‘पवार विरुद्ध पवार‌’ होऊ शकते, असा इशारा दिला. तर, अजितदादा यांचे बंधू श्रीनिवास व पुतणे युगेंद्र यांनी हा विषय बोलण्याची ही वेळ नव्हे, असे ठणकावून सांगितले. तर, खा. सुप्रिया सुळे यांनी या विषयाची माहिती नसल्याचे सांगितले.

Politics
Pune Fake Police Jewellery Scam: पुण्यात ‘पोलीस’ बनून ठग सक्रिय; महिलांचे लाखोंचे दागिने लंपास

गुरुवारी मतदानादिवशी जय पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी मी उमेदवार असावा, अशी बारामतीकरांची इच्छा असल्याचे मत व्यक्त केल्यानंतर राजकीय विषयाला तोंड फुटले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी राजकारणात त्या त्या वेळी काय घडेल, हे सांगता येत नाही, असे म्हणत पुढील निवडणूक ‌‘पवार विरुद्ध पवार‌’ अशी होऊ शकते, असे सांगितले. यापूर्वी लोकसभा व विधानसभेला अशा निवडणुका झालेल्या आहेत. आमचे पक्ष वेगळे आहेत, त्यामुळे आगामी काळात ‌‘जय विरुद्ध युगेंद्र‌’ अशी निवडणूक होऊ शकते, असे आमदार पवार म्हणाले.

Politics
Pune Kesar Mango Demand: पुण्यात केशर आंब्याची मागणी वाढली; हापूसला पर्याय ठरत आहे

त्यावर खा. सुप्रिया सुळे यांनी, याबाबत आपणाला काही माहिती नसल्याचे सांगितले. तर, अजितदादांचे बंधू श्रीनिवास व पुत्र युगेंद्र यांनी मात्र, आज हा विषय काढण्याची गरज नसल्याचे सांगितले. श्रीनिवास पवार म्हणाले की, या क्षणी हे बोलण्याची जय व रोहित या दोघांनाही गरज नव्हती. आणखी फार लांब जायचे आहे.

Politics
Fertilizer shortage due to war | युद्धस्थितीमुळे खतांची टंचाई भासणार

आज फार महत्त्वाचा दिवस आहे. आपण सगळे पुढे होऊन दादांसाठी हे करीत आहोत. कोणीही विरोधात उभे राहिलेले नाही. या क्षणी हे बोलण्याची आवश्यकता नव्हती. तर युगेंद्र म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक असू शकते. आज ही चर्चा करण्याची वेळ नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news