Crime News: बारामतीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम आरोपीला शहर पोलिसांकडून अटक

शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याने हे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

बारामती: अवघ्या १० वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी हसन शमशुध्दीन झारे उर्फ राजू (वय ५२, रा. खोली क्र. ८, अनंतआशा नगर, बारामती) या नराधमाला अटक केली. विशेष म्हणजे त्याला यापूर्वी अत्याचाराच्या गुन्ह्यात १० वर्षाची सक्तमजूरी झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याने हे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

त्याच्या विरोधात शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ७४, ७५ तसेच ३५२ व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) प्रमाणे गुन्हा दाखल केला. याबाबत पिडीतेच्या कुटुंबाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Crime News
Political News: ...तर काँग्रेसचा दारुण पराभव करूच चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामतीबाबत इशारा

तो शेजारीच राहणारा आहे. त्याने परिचयाचा गैरफायदा घेत या पिडितेला चाॅकलेटचे अमिष दाखवत घरात नेत तिच्याशी अश्लिल कृत्य केले, तसेच संबंधित घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत देखील त्याने यापूर्वी अश्लील वर्तन केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल, अप्पर अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख अधिक तपास करत आहेत.

Crime News
Satbara server down: नवे पीककर्ज व्हेंटिलेटरवर! डिजिटल सातबाराचे संकेतस्थळ हँग

शिक्षा भोगून आल्यावर केले घाणेरडे कृत्य

विशेष म्हणजे या आरोपीवर यापूर्वी २००९ मध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. त्यात त्याने १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या गुन्ह्यात त्याला १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली गेली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याच्या मानसिकतेत कोणताही बदल झाला नाही. आता त्याने १० वर्षीय बालिकेला आपली शिकार बनवल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news