Political News: ...तर काँग्रेसचा दारुण पराभव करूच चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामतीबाबत इशारा

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankulePudhari
Published on
Updated on

पुणे: “बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध करावी, अन्यथा काँग्रेसचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव करू,” असा इशारा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

भाजपच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त शहर भाजप कार्यालयात आयोजित झेंडावंदन कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा राजकीय प्रवास काँग्रेससोबतच झाला होता. त्यांनी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना मदत केली आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने निवडणूक न लढवता सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहावे.

Chandrashekhar Bawankule
Satbara server down: नवे पीककर्ज व्हेंटिलेटरवर! डिजिटल सातबाराचे संकेतस्थळ हँग

बावनकुळे म्हणाले, काँग्रेसने जर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्या इतिहासातील सर्वात दारुण पराभव करण्याची तयारी भाजपची तयारी आहे. काँग्रेसने संवेदनशीलता गमावली असेल आणि महाराष्ट्राची परंपरा विसरली असेल, तर त्यांनी निवडणूक लढवावी. मात्र, त्याचे परिणाम गंभीर असतील.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, त्यांनी आपली भूमिका स्वतः स्पष्ट करावी, असे बावनकुळे यांनी सांगितले. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच भाजपची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. यापूर्वीही अनेक वेळा काँग््रेासला बिनविरोध निवडणुकीत मदत केल्याचे त्यांनी नमूद केले.

Chandrashekhar Bawankule
Fake Baba Case Baramati: भोंदूबाबाला ४ वर्षांची सक्तमजुरी; बारामती न्यायालयाचा मोठा निर्णय

दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करणार

खरात प्रकरणातील दुष्कर्मात संबंधित अधिकाऱ्यांबाबत माहिती मिळत असून, एसआयटीमार्फत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात पक्षाचे बळ वाढवण्याचा संकल्प

भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगत, बावनकुळे म्हणाले की, पुण्यात पक्षाचे बळ 51 टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचा संकल्प आहे. हे करताना जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान कायम राखला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news