Baramati Kerosene Shortage: बारामतीत रॉकेलचा थेंबही नाही; घोषणेनंतर महिनाभर नागरिक प्रतीक्षेत

गॅस टंचाईनंतर शासनाची घोषणा हवेतच; रेशन दुकानांवर महिलांच्या चौकशीसाठी गर्दी
Kerosene
KerosenePudhari
Published on
Updated on

काटेवाडी: ग््राामीण व निमशहरी भागात घरगुती गॅस सिलिंडरटंचाईची समस्या गंभीर बनलेली असताना सरकारने रॉकेल वाटपाची घोषणा करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घोषणा होऊन तब्बल महिना उलटूनही बारामती तालुक्यात प्रत्यक्षात रॉकेलचा एक थेंबही पोहचलेला नाही. याबाबत चौकशी केली असता ग््रााहकांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात.

Kerosene
Pimparkhed Road Work Delay: 418 कोटींच्या रस्त्याला ‘ग्रहण’; अवसरी-पिंपरखेड मार्गावरील संथ कामामुळे संताप

युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील महिन्यात गॅस सिलिंडरची सेवा विस्कळीत झाली होती. पुरवठा कमी व मागणी जास्त, त्यामुळे गॅस वेळेत मिळत नसल्याने ग््राामीण भागातील अनेक कुटुंबांचे स्वयंपाकाचे नियोजन कोलमडले. या पार्श्वभूमीवर राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी गॅसला पर्याय म्हणून नागरिकांना रॉकेलचा पुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, या रॉकेलचा थेंबही नागरिकांना पाहायला मिळालेला नाही.

Kerosene
Daund Bhima Sugar Factory Election: भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीवरून कुल–थोरात संघर्ष पुन्हा पेटणार

सध्या उन्हाळी सुटीमुळे बाहेरगावी असलेले विद्यार्थी, नोकरदार व कुटुंबीय गावी परतले आहेत. त्यामुळे गॅसचा वापर वाढला आहे. मात्र, गॅसवितरण विलंबामुळे महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने रॉकेल वाटपाची घोषणा केली होती. मात्र, ती प्रत्यक्षात उतरलेली नसल्याने नागरिकांचा संताप अधिक वाढला आहे. रेशन दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून रॉकेल वाटपाचे आदेश आले आहेत. मात्र, प्रत्यक्ष साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ग््रााहकांच्या प्रश्नांना उत्तर देताना दुकानदारांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Kerosene
Ambegaon Electric Shock: आंबेगावमध्ये विजेच्या तुटलेल्या तारेचा शॉक; धनगर मेंढपाळ महिलेचा दुर्दैवी मृत्यू

अनेक गावांमध्ये महिलांनी रेशन दुकानांवर गर्दी करून चौकशी केली. त्यावर त्यांनी ‌’उद्यापासून मिळेल, साठा येत आहे, पुढील सोमवारी वाटप सुरू होईल,‌’ असे प्रशासनाकडून सांगितले जात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या काळात रेशन दुकानदारांकडे रॉकेलचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे ही घोषणा फक्त दिखावा होती का? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. ग््राामीण भागात पर्यायी रॉकेल इंधनाची गरज अधिक तीव झाली आहे. त्यामुळे केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष पुरवठा सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून रॉकेलपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी नागरिक, महिलावर्ग व रेशन दुकानदारांकडून होत आहे.

Kerosene
Jejuri Toll Demand: जेजुरीत टोल माफीची जोरदार मागणी

कोटा आणि लाभार्थी, यांत तफावत

बारामती तालुक्यासाठी शासनाकडून 33 हजार लिटर रॉकेलचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यात अंत्योदय कार्डधारकांची संख्या 8 हजार 12, केसरी शिधापत्रिकाधारक 86 हजार 782 इतके आहेच. यातून रॉकेलचा उपलब्ध कोटा आणि शिधापत्रिकांची संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे रॉकेल वाटप करताना प्रशासनास मोठी कसरत करावी लागणार आहे.

तालुक्याला अद्याप रॉकेलचा साठा उपलब्ध झालेला नाही. मात्र, रॉकेल प्राप्त होणार असल्याबाबतच्या सूचना वरिष्ठस्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. सर्कलनुसार वितरणव्यवस्था तयार करण्यात आली आहे. याबाबत रेशन दुकानदारांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

तितिक्षा बारापात्रे, पुरवठा अधिकारी, बारामती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news