Baramati Hirkani Run 2026: ‘बारामती हिरकणी रन 2026’ 29 मार्चला; महिलांसाठी 5 व 10 किमी धावस्पर्धा

जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम; 3.03 लाखांची बक्षिसे, मोफत प्रशिक्षण व बारामती दर्शनाची सुविधा
Marathon
MarathonPudhari
Published on
Updated on

बारामती: कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन, बारामती हेल्थ क्लब आणि बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 29 मार्च रोजी ‌‘बारामती हिरकणी रन 2026‌’चे आयोजन करण्यात आले आहे. 15 वर्षांपुढील मुली व महिलांसाठी 5 ते 10 किमी धावण्याची स्पर्धा यानिमित्ताने होणार आहे. विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत.

Marathon
Manchar Pangolin Scales Smuggling Case: मंचर वन विभागाची कारवाई; खवले मांजराचे खवले व सांबर शिंगांसह दोघे अटकेत

याबाबतची माहिती प्रशांत (नाना) सातव, डॉ. अजिनाथ खरात, डॉ. दिलीप लोंढे, डॉ. वैशाली पिल्ले, डॉ. स्नेहा पवार, ॲड. स्नेहा भापकर, डॉ. वरद देवकाते, डॉ. संजय पुरंदरे, डॉ. रत्नमाला खरात आदींनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. धावपळीच्या युगात महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढावी, व्यायामाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Marathon
Sunetra Pawar Malegaon Sugar Factory Director: माळेगाव साखर कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी फक्त महिलांसाठी प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. शहरातील तिरंगा चौक ते पेन्सिल चौक या मार्गावर दि. 29 रोजी सकाळी 6 वाजता ही रन सुरू होईल. स्पर्धेमध्ये नावनोंदणीसाठी संकेतस्थळावर 1 मार्चपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ही स्पर्धा 15 ते 25, 26 ते 35, 36 ते 45, 46 ते 55, 56 पेक्षा अधिक व त्यापुढील खुला वयोगट, अशा सहा वयोगटांत पार पडणार आहे. या रनमध्ये अंदाजे तीन हजार मुली-महिला सहभागी होतील, असा अंदाज आहे. सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, नाष्टा, वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे.

Marathon
Talegaon Dhamdhere Wife Murder Case: तळेगाव ढमढेरे येथे पत्नीचा हतोडीने खून; पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर

प्रत्येक गटातून विजेती व उपविजेती निवडली जाणार आहे. एकूण 3 लाख 3 हजार रुपयांची भरघोस वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक वयोगटात 5 व 10 कि.मी. रनमधून पहिल्या तीन विजेत्यांना भरघोस रोख रकमेचे बक्षीस जिंकता येणार आहे. जास्त स्पर्धकांची नोंदणी करणाऱ्या संस्थेला 11,111 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. बारामतीबाहेरून येणाऱ्या महिला, मुलींसाठी माफक दरात राहण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. यासह त्यांना अशी मोफत बारामतीदर्शन सहल घडवली जाणार आहे.

Marathon
Khed Kanersar Company Attack Case: कनेरसरमध्ये कंपनीसमोर टोळीचा हल्ला; २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी

स्पर्धकांच्या तयारीसाठी उपक्रम

‌‘बारामती हिरकणी रन‌’मध्ये सहभागी मुली, महिलांची तयारी करून घेण्यासाठी येथील तिरंगा चौक येथे रविवारी सकाळी 6.30 ते 8.00 या वेळेत मोफत प्रशिक्षण व आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. स्पर्धकाला रोज येणे शक्य असल्यास दररोज त्यांच्याकडून सराव करून घेण्याचीही व्यवस्था आयोजन समितीने केल्याची माहिती प्रशिक्षक डॉ. अजिनाथ खरात यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news