Sunetra Pawar Malegaon Sugar Factory Director: माळेगाव साखर कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त जागा भरली; बारामतीतील बैठकीत अधिकृत घोषणा
Sunetra Pawar
Sunetra PawarPudhari
Published on
Updated on

शिवनगर: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील रिक्त झालेल्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बुधवारी (दि. 18) झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी ही निवड जाहीर केली.

Sunetra Pawar
Talegaon Dhamdhere Wife Murder Case: तळेगाव ढमढेरे येथे पत्नीचा हतोडीने खून; पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विराजमान होते. अजित पवार हे बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून कारखान्याच्या ‌‘ब‌’ वर्ग प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून आले होते. तद्नंतर ते माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. त्यांच्या निधनामुळे संचालकपद रिक्त होते.

Sunetra Pawar
Khed Kanersar Company Attack Case: कनेरसरमध्ये कंपनीसमोर टोळीचा हल्ला; २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी

दरम्यान, बारामती तालुका खरेदी-विक्री संघाने अजित पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची शिफारस कारखाना प्रशासनाला केली होती. त्या अनुषंगाने निर्णय प्रक्रिया राबवताना सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज संचालकपदासाठी दाखल करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सुनेत्रा पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news