Baramati Heatwave: बारामतीत वाढत्या उष्णतेचा कहर; नागरिक, शेतकरी आणि जनावरेही उकाड्याने त्रस्त

अवकाळी पावसानंतरही तापमानात घट नाही; दुपारी रस्ते ओस, तरकारी पिके कोमेजू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
Heatwave
HeatwavePudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीवता प्रचंड वाढल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावूनही उकाड्यात कोणतीही घट झालेली नसून, सकाळपासूनच अंगाची लाही-लाही होत आहे. वाढत्या तापमानामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच शेतकरी सर्वाधिक त्रस्त झाला आहे.

Heatwave
Illegal Fetal Determination Racket: केडगावातील गर्भलिंगनिदान रॅकेटची खळबळजनक चर्चा; अपहरण, खंडणी आणि व्हिडीओ क्लिप्समुळे खळबळ

मे महिन्यातील कडक उन्हामुळे बारामतीचा बागायती पट्टा होरपळून निघत असून, यंदा अनेक वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद तालुक्यात झाली. सकाळची सुरुवातच घामाच्या धारांनी होत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत.

Heatwave
Ranjangaon MIDC Police Firing: रांजणगाव एमआयडीसी परिसरात पोलिसांवर गोळीबार; सराईत गुन्हेगार शेखर जाधव उसाच्या शेतातून फरार

सकाळी दहानंतर बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असून, नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्णतेचा परिणाम शेती क्षेत्रावर देखील जाणवत आहे. तरकारी पिके कोमेजू लागली असून, विहिरी, कूपनलिका आणि तलावांच्या पाणीपातळीत प्रचंड घट झाली आहे.

Heatwave
Pune Anandi Sansar Museum: कसबा पेठेतील तांबट आळीतील ‌‘आनंदी संसार‌’ भांड्यांचे अनोखे संग्राहालय जपते पुण्याचा पारंपरिक वारसा

शेतकरी सकाळच्या वातावरणातच शेतीची कामे उरकून घेत आहेत. जनावरांनाही उन्हाचा फटका बसत असल्याने अनेक जनावरे आजारी पडत आहेत. अवकाळी पावसानंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र पावसानंतर पुन्हा वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Heatwave
Pune Museum Tourism: सोशल मीडिया आणि हेरिटेज वॉकमुळे पुण्यातील संग्राहालयांना पर्यटकांचा वाढता प्रतिसाद

सध्या सकाळी दहापासूनच उन्हाचा प्रचंड चटका लागत आहे. तो सायंकाळी सहापर्यंत कायम राहत आहे. परिणामी घराबाहेर पडणे सुद्धा मुश्कील झाले आहे. दुचाकीवरून प्रवास करताना अंग भाजून निघाल्यासारखे होत आहे. सध्याचे वातावरण बघता पुढील काही दिवस तरी उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news