

पुणे: मोबाईलच्या जगातून बाहेर पडत आता पर्यटकांची पावले इतिहासाचा प्रत्यक्ष स्पर्श अनुभवण्यासाठी पुण्यातील दुर्मीळ वस्तूंचे जतन करणाऱ्या संग््राहालयांकडे वळत आहेत. सोशल मीडियावरील आकर्षक व्हिडीओ, माहितीपट, रील्स, छायाचित्रे, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि शहरात वाढलेल्या हेरिटेज वॉकमुळे संग््राहालयांबद्दल पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण होत असून, त्यामुळे संग््राहालयांमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक पुण्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी संग््राहालयाला भेट देत आहेत. यंदाच्या उन्हाळी सुट्यांमध्ये संग््राहालयांमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे आणि त्यामुळे शहरातील ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना मिळाली आहे. इतिहास, कला-संस्कृतीचा वारसा जपणारी पुण्यात सध्या अंदाजे 30 ते 35 संग््राहालये कार्यरत आहेत. सोमवारी (दि. 18 मे) असलेल्या जागतिक संग््राहालय दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने घेतलेल्या आढाव्यात संग््राहालयांकडे पर्यटकांचा ओढा वाढल्याचे समोर आले आहे.
राजा दिनकर केळकर संग््राहालय, पर्वतीवरील पेशवे संग््राहालय, रेल्वे म्युझियम, सायकल संग््राहालय, क्रिकेट संग््राहालय अशा विविध संग््राहालयांमध्ये रोज पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. काळानुसार बदलत संग््राहालयांनीही आधुनिकतेची कास धरल्यानेच हा बदल झाल्याचे दिसून येत आहे. डिजिटल डिस्प्ले, ऑडिओ गाइड, थी-डी व्हर्च्युअल टूर, एआयवर आधारित व्हिडीओ, सोशल मीडियासाठी खास ‘फोटो स्पॉट’ यामुळे तरुणाई आणि लहान मुलांचा प्रतिसाद वाढत आहे.
अनेक संग््राहालये फेसबुक, इन्स्टाग््रााम आणि यू-ट्यूबवरून दुर्मीळ वस्तूंची माहिती सातत्याने देत असल्याने इतिहासाविषयी उत्सुकता निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, संग््राहालयांची आर्थिक स्थितीही सुधारली आहे. राजा दिनकर केळकर संग््राहालयाचे संचालक सुधन्वा रानडे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत परिस्थिती बदलली आहे. आम्ही सोशल मीडियावरून संग््राहालयातील दुर्मीळ वस्तूंची माहिती सातत्याने देत आहोत. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून पर्यटक भेट देत आहेत.
सोशल मीडियावरील प्रसिद्धी, छायाचित्रे, व्हिडीओ आणि हेरिटेज वॉकमुळे संग््राहालयाबद्दल उत्सुकता वाढत आहे. त्यामुळे आठवडाभर पर्यटकांची गर्दी होत असून, उन्हाळी सुटीत प्रतिसाद आणखी वाढला आहे.
देववत जोशी, जोशीज् मिनिएचर रेल्वे म्युझियम
आम्ही गेल्या दहा वर्षांपासून ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करीत आहोत. त्यात संग््राहालय भेटीला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. हेरिटेज वॉकमुळे इतिहास, संस्कृती आणि कलेबद्दल जाणून घेण्यासाठी विशेषतः तरुणांची पावले संग््राहालयांकडे वळत आहेत. पुण्यात सध्या सुमारे 50 जण हेरिटेज वॉक क्षेत्रात कार्यरत असून, इतिहास अभ्यासक, स्वयंसेवी संस्था आणि पर्यटन गट हेरिटेज वॉक आयोजित करीत आहेत.
प्रा. गणेश राऊत, क्लब हेरिटेज