Baramati bypoll: धड भाषणही देता न येणारे, कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर खासदार..; काँग्रेसची पार्थ पवारांवर जोरदार टीका

Congress reaction Parth Pawar: महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केली होती. त्यांच्या टीकेला आता काँग्रेसकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
Congress reaction Parth Pawar
Congress reaction Parth Pawarfile photo
Published on
Updated on

Congress reaction Parth Pawar

बारामती: अजित पवार यांच्या निधनामुळे होत असलेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी "महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे" अशा शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता काँग्रेसकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पार्थ पवार यांना ‘धड भाषणही देता न येणारे’, ‘कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर नुकतेच खासदार झालेले’ आणि ‘कृतघ्न मुलगा’ अशा कडवट शब्दांमध्ये जोरदार हल्ला केला आहे.

Congress reaction Parth Pawar
Sanjay Raut | "बिनविरोध निवडणूक हा शेतकरी, कष्टकऱ्यांवरील अन्याय" : बारामती पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसने नेमकं काय म्हटलं आहे?

आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. "स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात एफआयआर नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे?" असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

पार्थ पवार काय म्हणाले होते?

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर खासदार पार्थ पवार म्हणाले की, “काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची मला गरज वाटत नाही. कारण सर्वांना माहित आहे की, ते काय करत आहेत? सर्व लोक मोठे आहेत, त्यांना काय चाललंय हे समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो त्यांना करू द्या. पण काँग्रेसला नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना दिसेल. कारण अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात सध्या काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे.”

सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? बारामतीबाबत 'उबाठा'ची पंचाईत

'मविआ'तील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. शरद पवार यांनी कुटुंब प्रमुख या नात्याने आपण कर्तव्य निभावत आहे. काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार आहे, असे सांगत स्वतःची सुटका करून घेतली. मात्र, शिवसेना उबाठा गटाची पाठिंबा देण्यावरून गोची झाली आहे.

अजित पवार यांच्याशी असलेले उत्तम संबंध लक्षात घेता त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असे शिवसेना उबाठातील बहुतांचे मत आहे. मात्र सहकारी काँग्रेस पक्ष या विषयावर नाराज झाला, तर विधान परिषदेतील निवडणुकीत वाद होऊ शकतील असे वास्तव आहे. यामुळे कोणतीही भूमिका न घेता बारामती पोटनिवडणुकीत फारसे काही करायचे नाही, असा निर्णय 'मातोश्री'वर झाला असल्याची चर्चा आहे.

Congress reaction Parth Pawar
Baramati by-election | संघर्षभूमी बारामती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news