Baramati Robbery Case: भिगवण-बारामती रोडवर थरारक दरोडा; कार अडवून कोयत्याने हल्ला, चौघांना अटक

जैनकवाडी फाट्याजवळ रात्रीची घटना; 12 हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी फरार
Baramati Robbery Case
Baramati Robbery CasePudhari
Published on
Updated on

बारामती : भिगवण-बारामती रोडवरील जैनकवाडी फाटा (ता. बारामती) येथे रात्रीच्या वेळी कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत कार अडवून प्रवाशांवर जीवघेणा हल्ला करून चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात 6 ते 7 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Baramati Robbery Case
Bhimashankar Strawberry Farmers: भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीला दिलासा; प्रतिकिलो 155 रुपयांचा हमीभाव

याप्रकरणी विश्वराजे ऊर्फ विश्वा चंद्रशेखर पाटील (वय 18, सध्या रा. बारामती, मूळ रा. उमरड, ता. करमाळा, जि. सोलापूर) या विद्यार्थ्याने फिर्याद दिली होती. या टोळीने फिर्यादी व त्यांचे सहकाऱ्यांचे वाहन दि. 7 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जैनकवाडी फाट्याजवळ अडवले. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडून कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या दरोडेखोरांनी फिर्यादीच्या बॅगसह इतर बॅगमधील विविध साहित्य, कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण 12 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला.

Baramati Robbery Case
Tararani Jayanti Speech Competition: महाराणी ताराराणी जयंतीनिमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

त्यानुसार तपास केला असता संबंधित टोळी धुडगूस घालत असल्याची माहिती होमगार्ड जवान सूर्यवंशी यांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिली. यादव यांनी तात्काळ आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून यादव यांनी आरोपींचे वर्णन, वापरलेली वाहने याच्या आधारे तातडीने शोधमोहीम सुरू केली. याबाबत भिगवण, दौंड व यवत पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले.

Baramati Robbery Case
Sinhagad Tourist Crowd; सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी; एका दिवसात 80 हजारांहून अधिक उपद्रव शुल्क जमा

दुचाकी व रिक्षाच्या मदतीने पळणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला-सुपा रोडवर थरारक पाठलाग करण्यात आला. या दरम्यान दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले, तर उर्वरित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांनी हार न मानता पुन्हा सखोल शोधमोहीम राबवत पळालेल्या तिघांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. एक आरोपी मात्र फरार असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

Baramati Robbery Case
Baner Balewadi: बाणेर-बालेवाडीत तरुणीच्या मृत्यूप्रकरणी पारदर्शक तपासाची मागणी; नागरिकांचा शांततापूर्ण मोर्चा

अटकेतील आरोपींकडून तीन धारदार कोयते, एक मोठा बेसबॉल रॉड, तसेच चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत कृष्णा राजू मोरे (रा. मार्केट यार्ड, पुणे), रुपेश सुरेश आडवाल (रा. रासकर पार्क, कात्रज), संकेत अनंत शिलते (रा.पर्वती दर्शन, पुणे), ईश्वर महादेव मिसाळ (रा. खोपडे नगर, कात्रज) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम पवार, अमोल कदम, बारामती तालुक्याचे पोलिस अमलदार मनोज पवार, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, राहुल लांडगे यांच्यासह भिगवण, यवत, कुरकुंभ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news