Bhimashankar Strawberry Farmers: भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरीला दिलासा; प्रतिकिलो 155 रुपयांचा हमीभाव

पर्यटन ठप्प झाल्याने अडचणीत आलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादकांना प्रशासनाचा आधार; आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश
Bhimashankar Strawberry Farmers
Bhimashankar Strawberry FarmersPudhari
Published on
Updated on

मंचर : भीमशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव आणि तालुका कृषी विभाग, आंबेगाव यांनी समन्वय साधत आधार दिला आहे. प्रशासनाच्या समन्वयातून स्ट्रॉबेरीला 155 रुपये किलो हमीभाव देण्यात आला.

Bhimashankar Strawberry Farmers
Tararani Jayanti Speech Competition: महाराणी ताराराणी जयंतीनिमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी यंदा मोठ्या अडचणीत सापडली होती. मंदिर काही महिन्यांपर्यंत बंद राहिल्याने पर्यटकांची वर्दळ कमी झाली आहे. स्थानिक बाजारपेठ ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव आणि तालुका कृषी विभाग, आंबेगाव यांनी समन्वय साधत स्ट्रॉबेरी खरेदी करून हमीभाव देण्यासाठी दिलासा देणारी योजना राबविली. यामुळे स्ट्रॉबेरीला प्रतिकिलो 155 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला.

Bhimashankar Strawberry Farmers
Sinhagad Tourist Crowd; सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी; एका दिवसात 80 हजारांहून अधिक उपद्रव शुल्क जमा

लहान शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी पुणे-मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत नेणे शक्य होणार नसल्याने प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी मध्यवर्ती स्वयंपाकगृहामार्फत शेतकऱ्यांकडून थेट स्ट्रॉबेरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांचा माल थेट विकला जाऊ लागला. स्ट्रॉबेरी आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आहारात समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पौष्टिक फळांचा लाभ मिळत आहे.

Bhimashankar Strawberry Farmers
Baner Balewadi: बाणेर-बालेवाडीत तरुणीच्या मृत्यूप्रकरणी पारदर्शक तपासाची मागणी; नागरिकांचा शांततापूर्ण मोर्चा

दरम्यान, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, खत व्यवस्थापन आणि काढणीपश्चात प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आदिवासी विकास विभागामार्फत लागवडीसाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आल्याने यंदा या भागात दर्जेदार स्ट्रॉबेरी उत्पादनात वाढ झाली आहे. प्रशासकीय पाठबळामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा 178 शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला 5 गुंठ्यांसाठी सुमारे 47 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

Bhimashankar Strawberry Farmers
Gliricidia Flowering Ambegaon: आंबेगावच्या वनहद्दीत गिरिपुष्पांचा बहर; जांभळट-पांढऱ्या फुलांनी निसर्गरम्य दृश्य

या उपक्रमामुळे दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ‌’व्हिटॅमिन-सी‌’युक्त ताजी फळे मिळू लागली आहेत. पुढील काळात भीमाशंकर परिसराला स्ट्रॉबेरी उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी आणि या उत्पादनाला व्यापक ओळख मिळवून देण्यासाठी ‌‘भीमाशंकर स्ट्रॉबेरी महोत्सव‌’ आयोजित करण्याचा मानस प्रकल्प अधिकारी देसाई यांनी व्यक्त केला.

शासन आणि प्रशासनाने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे आमचे आर्थिक नुकसान टळले. कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन व प्रकल्प कार्यालयाच्या खरेदी उपक्रमामुळे आम्हाला हमी बाजारपेठ मिळाली.

अर्जुन भारमळ, प्रगतिशील शेतकरी, फुलवडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news