

बारामती: निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने बारामतीतील उपलब्ध पाणीसाठा आता मर्यादित उरला आहे. परिणामी रविवार ( दि. १८) पासून बारामती शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.
शनिवार (दि. १७) पर्यंत बारामती शहर, रुई व बारामती ग्रामीण या भागात नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे; परंतु त्यानंतर दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे नगर परिषदेकडून सांगण्यात आले.
रविवारी (दि. १८) रोजी पाणीपुरवठा न होणारा भाग : म्हाडा काॅलनी, मुजावर वाडा, देवळे ईस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एसटी स्टॅण्ड परिसर, सटवाजीनगर, जवाहरनगर, पोष्ट रोड, हंबीर बोळ, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, विजयनगर, साई गणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, वसंतनगर, अवधूतनगर, व्हील काॅलनी, तपोवन काॅलनी, विवेकानंदनगर, अवचट इस्टेट, ख्रिश्चन काॅलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, पतंगशाहनगर, मेडद रोड, क्षत्रीय नगर, श्रावण गल्ली, कोष्टी गल्ली, तांदूळवाडी वेस चौक, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड पेठ, महावीर पथ, बुरुड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसाब गल्ली, कचेरी रोड, बयाजीनगर, गावठाण, साईनगर, ग्रीन पाण, संपूर्ण रुई भाग.
सोमवार (दि. १९) रोजी पाणीपुरवठा न होणारा भाग : संपूर्ण कसबा परिसर, फलटण रोड, रेणूकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमान नगर, माळेगाव काॅलनी, सातव वस्ती, शिवाजीनगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावतामाळी नगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशीलनगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर, नवीन मोरगाव रोड संपूर्ण परिसर.