Munition India Limited: म्युनिशन इंडियाच्या कार्यकारी संचालकासह तिघांना १९ ऑक्‍टोबरपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे, म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्लीतील छापे; संरक्षण उत्पादन, खरेदी आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोपनीय माहिती फुटल्‍याचा संशय
Jail
JailPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: देशाच्या संरक्षण उत्पादनाशी संबंधित संवेदनशील माहिती फुटल्यासह लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्याने संरक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुणे मुख्यालय असलेल्या म्युनिशन इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्यासह तिघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्‍यानंतर त्‍यांना विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले.

त्‍यांना विशेष न्यायाधीश आर. आर. मेंढे यांनी १९ ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्ये ड्रोन व दारूगोळा निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कंसल आणि अनिल कुमार यांचा भाऊ बी. हर्षवर्धन यांचा समावेश आहे.

Jail
Naam Foundation: नानांचे कार्य थांबणार नाही; ‘नाम’चे जलसंवर्धन सुरूच! निधनानंतर चौथ्या दिवशी बंधाऱ्यांचे खोलीकरण सुरू

सुमारे ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कंत्राटाच्या अनुषंगाने लाचखोरी झाल्याचा आरोप असून, या कारवाईत विविध ठिकाणांहून दोन कोटी २३ लाखांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने १२ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी पुण्यासह म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्लीतील संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

अनिल कुमार हे एमआयएलमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना खासगी कंत्राटदार आणि पुरवठादारांशी संगनमत करून लाच स्वीकारत असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. सीबीआयच्या पथकाने पुण्यात अनिल कुमार यांच्या निवासस्थानासह संबंधित ठिकाणी झाडाझडती घेतली.

Jail
Khed News: १० लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी; जैदवाडीच्या सरपंच शीतल जैद यांच्या तक्रारीनंतर खेड पोलिसात गुन्हा दाखल

या कारवाईत एक कोटी ७३ लाख रुपयांची रोकड आढळली. तसेच, म्हैसूर, बंगळुरू आणि दिल्ली येथील झाडाझडतीत आणखी ५० लाख रुपये आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. या रोकडीचा स्रोत, कंत्राटाशी असलेला संबंध आणि कथित लाचखोरीतील आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.

आशिष कंसल हे एसएमटीपी लिमिटेड या ड्रोन तंत्रज्ञान आणि दारूगोळा निर्मितीशी संबंधित कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक आहेत. या कंपनीचा एमआयएलसोबत ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कराराच्या संदर्भात संपर्क असल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येते.

या कराराशी संबंधित व्यवहार, अधिकृत निर्णयप्रक्रिया आणि कथित आर्थिक देवाणघेवाण यांची माहिती सीबीआयकडून तपासली जात आहे. अधिक तपासासाठी तिघांच्‍याही पोलिस कोठडीची मागणी सीबीआयचे सरकारी वकील ए. डी. आरीकर यांनी केली. न्यायालयाने तिघांनाही १९ ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news