Naam Foundation: नानांचे कार्य थांबणार नाही; ‘नाम’चे जलसंवर्धन सुरूच! निधनानंतर चौथ्या दिवशी बंधाऱ्यांचे खोलीकरण सुरू

दुष्काळी भागातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांना आधार देण्याचा उपक्रम; जलसंधारणाच्या कामाला सुरुवात
Naam Foundation
Naam FoundationPudhari
Published on: 
Updated on: 

खडकवासला: ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून दुष्काळाशी सामना करण्यासाठी नाम फाउंडेशनने जलसंवर्धनाचे काम सुरू केले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाजाला आधार देण्याचे कार्य थांबू नये, हा नाना पाटेकर यांचा विचार पुढे नेत फाउंडेशनने दुष्काळी भागात कामाला सुरुवात केली आहे.

गेल्या आठवड्यात नाना पाटेकर यांचे आकस्मिक निधन झाले. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी नाम फाउंडेशनने दुष्काळी भागात जलसंवर्धनाचे काम सुरू केले.

Naam Foundation
Khed News: १० लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी; जैदवाडीच्या सरपंच शीतल जैद यांच्या तक्रारीनंतर खेड पोलिसात गुन्हा दाखल

कोणत्याही परिस्थितीत नाम फाउंडेशनचे काम थांबता कामा नये. रंजल्या-गांजलेल्या शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना आधार देणे हे आपले कर्तव्य आहे, असे नाना पाटेकर नेहमी सांगत असत, अशी माहिती नाम फाउंडेशनचे समन्वयक आणि खानापूर (ता. हवेली) येथील माजी सरपंच नीलेश जावळकर यांनी दिली.

पारगाव आणि नागरगाव (ता. दौंड) येथील नदीपात्रातील बंधाऱ्यांचे खोलीकरण व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी फाउंडेशनने दोन जेसीबी मशिन, तीन ट्रक आणि १० मजूर उपलब्ध करून दिले आहेत.

Naam Foundation
Raju Shetti: स्वाभिमानीने ऊस आंदोलनाची परिस्थिती निवळण्यास मदत करावी; राजु शेट्‌टी यांच्याकडे राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी

पाटबंधारे विभागाने या कामासाठी दगड दिले आहेत. या कामामुळे परिसरासह दौंड आणि शिरूर तालुक्यांतील शेकडो एकर शेतीला दुष्काळात पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

फाउंडेशनच्या वतीने खडकवासला, सिंहगड आणि पानशेत परिसरासह राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये धरणे, बंधारे, तलाव, ओढे-नाले यांची सफाई तसेच पाणी अडविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. फाउंडेशनचे संस्थापक, अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सचिव गणेश थोरात यांच्या देखरेखीखाली दुष्काळाचा सामना करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news