Bangladeshi Women Arrested: बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी तरुणींना पकडल; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
Bangladeshi Women Arrested
बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी तरुणींना पकडल; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाईfile
Published on
Updated on

पुणे: घुसखोरी करून भारतात आलेल्या बेकायदा वास्तव्य करणार्‍या दोन बांगलादेशी तरुणींंना गुन्हे शाखेच्या पथकाने कात्रजमधील सुखसागरनगर परिसरातून ताब्यात घेतले. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आल्यानंतर आतापर्यंत आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून बांगलादेशी नागरिकांची मायदेशी रवानगी करण्यात येणार आहे. (Latest Pune News)

Bangladeshi Women Arrested
Indapur News: इंदापूर पोलिसांचा ‘बुलेटराजां’ना दणका; 35 बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

मुसम्मद सोनी अब्दुल समद, मोनीरा बेगम (वय 19, दोघी मूळ रा. गुजिया, जि. बोगारा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलिस कर्मचारी अमोल घावटे, प्रफुल्ल मोरे यांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने दोघींना ताब्यात घेतले.

Bangladeshi Women Arrested
Khed Taluka: कुंडकेश्वर अपघातातील मृतांच्या वारशांना 7 लाखांची मदत, जखमींचा खर्च राज्य सरकार उचलणार

चौकशीत त्यांच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र सापडले. उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलिस कर्मचारी राजेंद्र नलावडे, कानिफनाथ कारखेले, अमोल घावटे, गणेश थोरात, प्रफुल्ल मोरे, भरत गुंडवाड, गणेश माने, सर्जेराव सरगर, शिवाजी सातपुते, शीतल जमदाडे, नेहा तापकीर यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news