Baneshwar Temple Mahashivratri: महाशिवरात्रीनिमित्त नसरापूरच्या बनेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

मध्यरात्रीच गाभारा खुला; एकाच दिवशी सुमारे ५० हजार भाविकांचे दर्शन, नियोजनाचे कौतुक
Baneshwar Temple Mahashivratri
Baneshwar Temple MahashivratriPudhari
Published on
Updated on

माणिक पवार

नसरापूर: महाशिवरात्र निमित्त शिवशंभोच्या घोषात नसरापूर येथील बनेश्वर मंदिरात मध्यरात्रीच दर्शनासाठी गाभारा खुला करण्यात आला आहे. आज पहाटेपासून हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले असून यंदा भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याने बनेश्वर मंदिर परिसर बहरले आहे. देवस्थान ट्रस्टने केलेल्या योग्य नियोजनामुळे भाविकांची अडचण न होता सुरळीत दर्शनबारी सुरु आहे.

Baneshwar Temple Mahashivratri
Pune Municipal Election Analysis: धनकवडी–कात्रज डेअरी प्रभागात भाजपचा झेंडा; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वा निमित्त नसरापूर ( ता. भोर ) येथील बनेश्वर मंदिरात पहाटे पासुनच भाविकांची रांग लागली होती. मध्यरात्री सव्वाबारा वाजता महसूल अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाल्यावर भाविकांसाठी दर्शन व अभिषेकसाठी गाभारा खुला करण्यात आला. पहाटे सहा वाजता गाभारा बंद करण्यात आले होते. त्यानंतर दर्शनबारीतून रांगेतून बाहेरील गाभाऱ्या मधून भाविकांचे दर्शन शिस्तीत सुरु आहे. सध्या दर्शनबारीची रांग मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर पर्यंत गेली असून दुपारपर्यत ५० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ट्रस्टच्या वतीने दर्शनबारीसाठी मंडप उभारण्यात आले असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व प्रसाद वाटप करण्यात येत आहे.

Baneshwar Temple Mahashivratri
Jejuri Mahashivratri Trikal Darshan: महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

दर्शन बारीच्या ठिकाणी स्क्रीनवर गाभाऱ्यातील दृश्य प्रसारित करण्यात आले. मुख्य दरवाज्या पासुन नसरापूर गावा पर्यंत एक किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजुस यात्रेची खेळणी, खाऊ, पुस्तके, आईस्क्रीम यांची दुकाने सजली आहेत. मंदिर परीसरात राजगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आले असून वनविभागाचे कर्मचारी उपस्थित आहेत.

Baneshwar Temple Mahashivratri
Maharashtra Indigenous Cattle IVF Program: देशी गोवंश संवर्धनासाठी आयव्हीएफ-भ्रूण प्रत्यारोपण करार; दूध उत्पादन वाढीस चालना

नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. डॉ. श्याम दलाल यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत ताक वाटप करण्यात येत आहे.

Baneshwar Temple Mahashivratri
AI for Agriculture 2026: मुंबईत ‘एआय फॉर ॲग्री 2026’ जागतिक परिषद; शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवा युगारंभ

दरम्यान, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्या तृप्ती खुटवड पंचायत समिती सदस्य विशाल कोंडे, अशोक वाडकर, उद्योजक निखिल डिंबळे, धनेश डिंबळे, नसरापूरचे माजी उपसरपंच संदीप कदम, नामदेव चव्हाण, इरफान मुलानी, ज्ञानेश्वर झोरे, यांनी बनेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार, उपाध्यक्ष हनुमंत कदम, सचिव अनिल गयावळ, प्रकाश जंगम, आबासाहेब यादव, काशिनाथ पालकर, सतीश वाल्हेकर, ज्योती चव्हाण, व्यवस्थापक प्रसन्न गयावळ, आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news