Pune Tree Cutting: बाणेरमध्ये धक्कादायक वृक्षतोड; अभिनव कला महाविद्यालयात मोठी कत्तल उघड

परवानगी फक्त फांद्या छाटण्याची असताना ६० ते ७० झाडांची बुंध्यापासून तोड; महापालिकेची चौकशी सुरू
Abhinav college trees
Abhinav college treesPudhari
Published on
Updated on

बाणेर: पाषाण-सूस रोडवरील अभिनव कला महाविद्यालयाच्या आवारात वृक्षतोडीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेने महाविद्यालयाला केवळ ६ ते ७ झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. मात्र, परिसरात सुमारे ५० ते ७० जुनी झाडे बुंध्यापासून तोडण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. शैक्षणिक संस्थेत वृक्षांची बेकायदा कत्तल होत असताना क्षेत्रीय कार्यालय प्रशासन नेमके काय करीत होते? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Abhinav college trees
Pune Overhead Cables Removal: पुण्यात ओव्हरहेड केबल्स हटवण्यासाठी कडक SOP; धोकादायक केबल्सवर मोठी कारवाई

या महाविद्यालयाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जुनी आणि मोठी झाडे होती. ही झाडे नेमकी कोणत्या कारणासाठी तोडण्यात आली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, ही वृक्षतोड स्थानिक नागरिक आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे आणि वृक्षांचे महत्त्व शिकवले जाते. मात्र, शैक्षणिक संस्थेच्या आवारात वृक्षतोड होणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

Abhinav college trees
Pune Mulshi Dam Water: मुळशी धरणातील 5 टीएमसी पाण्यासाठी पुणे महापालिकेचा पाठपुरावा

महापालिकेच्या पथकाने केलेल्या प्राथमिक पाहणीत या ठिकाणी ५० ते ७० झाडे पूर्णपणे तोडल्याचे निष्पन्न झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात असे अनधिकृत काम होणे खेदजनक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, वृक्षतोड करणारे ठेकेदार आणि महाविद्यालयाच्या संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Abhinav college trees
PMC Fixed Deposit Issue: पुणे महापालिकेच्या 1250 कोटी मुदतठेवींचा विलंब; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोट्यवधींचे नुकसान

फांद्या छाटणे ही केवळ एक पळवाट?

महानगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा झाडांच्या फांद्या तोडणे किंवा त्यांची उंची कमी करणे, अशा कारणांसाठी अर्ज केले जातात. परंतु, परवानगी केवळ फांद्या छाटण्याची घ्यायची आणि त्याच्या नावाखाली संपूर्ण झाडच गायब करायचे, अशी एक नवी पळवाट सध्या शोधली जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. असाच प्रकार अभिनव महाविद्यालयात घडल्याचे उघड झाले आहे. यामुळे फांद्या छाटणीला परवानगी देताना प्रशासनाने योग्य ती सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Abhinav college trees
Vadgaon Budruk Market Issue: वडगाव बुद्रुक भाजी मंडईतील गाळे ओस; रस्त्यावर पुन्हा विक्रेत्यांची गर्दी

अभिनव महाविद्यालयाने केवळ ६ ते ७ झाडांची उंची कमी करण्यासाठी आणि फांद्या तोडण्यासाठी परवानगी मागितली होती. महापालिकेने फक्त फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. परंतु, नागरिकांच्या तक्रारीनंतर आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता तिथे ६० ते ७० झाडे बुंध्यापासून तोडण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांचा खुलासा मागवला आहे. वृक्षतोड करणारे ठेकेदार आणि महाविद्यालयाच्या संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल.

अनिल साबळे, वृक्ष विभाग निरीक्षक, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news