One sided love case: एकतर्फी प्रेमसंबंधातून जागामालकाचा खून; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात आरोपी स्वतः हजर

ही घटना गुरुवारी (दि.६) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रायकर फार्म हाऊस, बाणेर परिसरात घडली आहे.
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

पुणे: बाणेरमधील ब्रह्माकुमारी मेडिटेशन सेंटरमधील महिलेशी एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात तेथील जागामालकावर तरुणाने धारधार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर तो स्वतः चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हजर झाला.

घनश्याम संजय रायकर (वय ४९, रा. ब्रह्माकुमारी मेडिटेशन सेंटरसमोर, बाणेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सोलुमन सूर्यभान शेंडगे (वय ४९, रा. फिरस्ता) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या विरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Animal Husbandry Scheme: ‘पशुधन विमा योजने’स मान्यता; केंद्र व राज्य सरकार ८५ टक्‍के, तर लाभार्थी भरणार १५ टक्के प्रीमियम

ही घटना गुरुवारी (दि.६) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रायकर फार्म हाऊस, बाणेर परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम रायकर यांची बाणेर येथे जागा आहे. त्यांनी २५ वर्षांपूर्वी तेथे ब्रह्माकुमारी मेडिटेशन सेंटर उभारले आहे. ते तेथेच काम पाहतात.

आरोपी सोलुमन याचे लग्न झाले असून, त्याचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे तो असाच फिरस्ती आहे. ब्रह्माकुमारी सेंटरमधील एका महिलेशी त्याचे एकतर्फी प्रेम असल्याची माहिती आहे. तो गेल्या एक वर्षापासून या महिलेला त्रास देत होता.

Crime
Maharashtra Politics: राजकीय फायद्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगेंना मोठे केले; लक्ष्मण हाके यांचा घणाघात

गुरुवारी सकाळी तो चाकू घेऊन आला. त्यावेळी जागामालक रायकरही तेथेच होते. त्यांच्यात वादावादी झाली. त्याने चाकू दाखविला. तेव्हा रायकर हे पळून जाऊ लागले. तेव्हा सोलुमन याने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर सपासप वार केले. ते तेथेच कोसळले. त्यानंतर सोलुमन तेथून पळून थेट चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हजर झाला.

त्याने तेथील पोलिसांना आपण खून केल्याचे सांगितले. तत्काळ चतुःश्रृंगी पोलिसांनी हा प्रकार बाणेर पोलिसांना कळविला. नागरिकांनी रायकर यांना उपचारासाठी नजकीच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटना घडलेली हद्द बाणेर पोलिस ठाण्यातील आहे. त्यामुळे त्याला पुढील कारवाईसाठी बाणेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास बाणेर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news