Pune Mula River Sand Mining: बालेवाडीत मुळा नदीपात्रात वाळूउपसा सुरू?

रात्रीच्या कारवायांवर नागरिकांचा आक्षेप; संबंधितांवर कारवाईची मागणी
Mula River Sand Mining
Mula River Sand MiningPudhari
Published on
Updated on

मोहसीन शेख

बाणेर: वाकड स्मशानभूमीजवळ बालेवाडी हद्दीत असलेल्या मुळा नदीमध्ये खड्डे करून वाळूउपसा केल्याचा प्रकार दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी हा वाळूउपसा चालत असल्याने ‌‘रात्रीस खेळ चाले‌’ असाच प्रकार बालेवाडीत वाळूचोरीबाबत सुरू असल्याचे लक्षात येत आहे. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Mula River Sand Mining
Purandar Onion Price Fall: पुरंदरमध्ये कांद्याचे दर कोसळले; शेतकरी संकटात

एकीकडे नदीसुधार प्रकल्प सुरू असताना दुसरीकडे मात्र नदीत खड्डे करून वाळूउपसा केली जात असल्याचे लक्षात येत आहे. प्रशासन मात्र नदीसुधार प्रकल्पाकडे लक्ष देत आहे. परंतु, या मुळा नदीपात्राच्या प्रवाहामध्ये होत असलेल्या वाळूउपशावर कोण लक्ष देणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या आधीही काही वर्षांपूर्वी औंध परिसरामध्ये अशाच प्रकारचे रात्रीच्या वेळी वाळूउपसा चालायची, तर काही महिन्यांपूर्वी म्हाळुंगेत मुळा नदीपात्रातील वाळू काढल्याचे सांगितले जात आहे, तर आता मात्र बालेवाडी परिसरात हा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येत आहे.

Mula River Sand Mining
Pune High Blood Pressure Screening: पुण्यात 75 हजार नागरिकांना उच्च रक्तदाब

पर्यावरणप्रेमी नागरिक या ठिकाणी फिरायला गेले असता त्यांच्या लक्षात आले की, या ठिकाणावरून वाळूउपसा होत आहे. चाळलेली वाळू या ठिकाणी साईडला ठेवण्यात आलेली आहे, तर दोन ते तीन मोठे खड्डे नदीपात्रात दिसून आले, त्यातून याआधीही वाळूचोरी झाल्याचे लक्षात येत आहे. या ठिकाणची परिस्थिती पाहिली असता जेसीबीच्या साहाय्याने खोदून, ट्रकने या परिसरातील वाळू नेली जात असल्याचे लक्षात येत आहे. या नदीपात्रातील वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करू लागले आहेत.

Mula River Sand Mining
Pune Education Officer Irregularities: पुणे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर अनियमिततेचे आरोप

'महसूल‌’शी बोलून कारवाई करू

याबाबत औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर विषय हा महसूल विभागाकडे येत असून, त्यांच्याशी संपर्क करून कारवाई केली जाईल.

वाळूउपसा करून पर्यावरणाच्या ऱ्हास करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. पर्यावरण संवर्धनासाठी येथे विविध संघटना व नागरीकच झटत आहेत, आंदोलन करत आहेत व रात्री-अपरात्री अशा प्रकारची चोरी करणाऱ्यांना योग्य ते शासन झाले पाहिजे, यासाठी प्रशासनाने संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

रमेश रोकडे, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन

Mula River Sand Mining
Narayangaon Tamasha Season 2026: नारायणगावात तमाशा हंगामाला जोरदार सुरुवात

नेमका हा प्रकार कुठे सुरू आहे अद्याप माहिती नाही. सदर ठिकाणी पाहणी करून पंचनामा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. सुरू असलेला वाळूउपसा रोखण्यासाठी योग्य ती टीम लावून कारवाई करू.

सुजित मंडलेचा, संबंधित अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news