देहूगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : देहूगाव परिसरातील अनेक रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या वर्दळीच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना तसेच पादचार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झेंडेमळा ते हगवणे मळा, काळोखे मळा, देहूरोड डीएडी डेपो ते किन्हगाव या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
झेंडमळा ते काळोखेमळा आणि किन्हईगाव हे दोन रस्ते देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या अंतर्गत येतात. हीच परिस्थती देहूफाटा ते सांगुर्डी रस्त्याची झाली असून, या रस्त्यांची इतकी दुरवस्था झाली असून त्या खड्डयात चिखल साचला आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. तर शेतकर्यांना आपल्या शेतातील पीक, भाजीपाला बाजारात घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विठ्ठलनगर (सांगुर्डी) ते देहूगाव फाटा या रस्त्याचे डांबरीकरणाची पुरती वाट लागली आहे. या खड्ड्यांमुळे कामगार, शेतकरी, शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करताना हैराण झाले आहेत.
हेही वाचा