Bhimashankar Babaji Kale Controversy: भीमाशंकर वादावर बाबाजी काळेंची भूमिका स्पष्ट; ‘मंदिर खेडमध्येच’

‘विरोधक दिशाभूल करत आहेत’; विकास आराखड्यात खेड तालुक्याच्या हक्कासाठी लढा सुरूच असल्याचा दावा
Bhimashankar Temple
Bhimashankar TemplePudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: विरोधक एक वाक्य पकडून विपर्यास करत जनतेची दिशाभूल करत आहेत . त्यांना विकासाचे देणे घेणे नाही तर माझ्यावर टीका करण्यासाठी संधी हवी आहे.अशा टीकेला आपण भीक घालत नाही असे आमदार बाबाजी काळे यांनी ठणकावून सांगीतले आहे. यापूर्वी विधानसभेतही भीमाशंकर खेड तालुक्यात असल्याची भूमिका मांडली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Bhimashankar Temple
Jejuri Bhandara Safety: जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्यावर शासनाची कारवाई; जेजुरीकरांकडून स्वागत

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये तालुका उल्लेखावरून निर्माण झालेल्या वादावर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंदिर खेड तालुक्यात असल्याचे स्पष्ट करत, विकास आराखड्यात दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याने जनतेच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Bhimashankar Temple
Purandar Sandalwood Seizure: पुरंदरमध्ये ATSची धडक कारवाई; 560 किलो चंदन जप्त

१५ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीच्या नोटिफिकेशनमध्ये "टप्पा क्रमांक १ - श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा ता. आंबेगाव सह खेड जिल्हा पुणे (रुपये १४८.३७ कोटी)" असा उल्लेख होता. यावर १८ मे रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत आमदार बाबाजी काळे यांनी मुद्दा उपस्थित केला.

Bhimashankar Temple
Saswad Gang Crime: सासवडमध्ये तरुणांच्या टोळ्यांचा वाढता प्रभाव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

"भीमाशंकर मंदिर हे १००% खेड तालुक्यात आहे. त्यामुळे विकास आराखड्यात प्रथम खेड तालुका व नंतर आंबेगाव तालुका असा उल्लेख व्हावा," असा आग्रह धरला. वळसे पाटील यांनी मंदिर खेड तालुक्यात असल्याचे मान्य केल्याचेही व्हिडिओ पुरावा असल्याचे काळे यांनी सांगितले. विकास आराखड्यातील काही कामे दोन्ही तालुक्यांत विभागलेली असल्याने हा तोडगा काढण्यात आला.

"हा विषय फक्त विकास आराखड्यापुरता मर्यादित आहे, मंदिरासंबंधी नाही," असा स्पष्ट निर्वाळा आमदार काळे यांनी दिला. आपण आमदार होण्यापूर्वी १४७ कोटींचा आराखडा तयार केला होता. या आराखड्यात खेड तालुक्यात एकही रुपयाचे काम नव्हते, फक्त आंबेगाव उल्लेख होता. २८८ कोटींच्या दुसऱ्या आराखड्यातही जास्त कामे आंबेगावमध्ये प्रस्तावित करण्यात आली होती.

Bhimashankar Temple
Bhimashankar Name Dispute: भीमाशंकर ‘खेड-आंबेगाव’ नामकरणाला विरोध; दिलीप मोहिते पाटलांचे निवेदन

मात्र, काळे यांनी खेडमध्ये भीमाशंकर परिसरात ४४ कोटी आणि भोरगिरी-कोटेश्वर परिसरात ३३ कोटी रुपये मिळवले. आता १७२ कोटींच्या पुनर्वसन आराखड्यात भीमाशंकर वाडीतील घर-दुकानांचे पुनर्वसन करण्यासाठी ३२ एकर जागा घेण्यात आली आहे. यामध्येदेखील "आंबेगाव सह खेड" उल्लेख करण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस, वळसे पाटील यांनी खेड तालुक्याचा उल्लेख व भीमाशंकर वाडी खेडचा भाग असल्यासंबंधी सहमती दर्शवल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. पदरवाडी व इतर विकासकामांबाबत मांडलेल्या मुद्द्यांचेही स्वागत झाले.

चुकीच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही. खेड तालुक्यातील जनता आमच्यावर विश्वास ठेवते. आम्ही जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहू.

बाबाजी काळे , आमदार खेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news