

बाणेर : औंध - बाणेर क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चांगलीच रंगत पहावयास मिळाली. यामध्ये तिकीट कापाकापी तर इतर पक्षात पक्षप्रवेश घेऊन एबी फॉर्म आनून उमेदवारांनी अखेरच्या दिवशी आपले अर्ज दाखल केले आहेत.
प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपच्या वतीने उमेदवारी सनी निम्हण, भक्ती गायकवाड, परशुराम वाडेकर, सपना छाजेड यामध्ये परशुराम वाडेकर हे त्यांच्या पत्नीच्या जागी तिकीट बसले आहे. परंतु येथील इतर तीनही उमेदवार भाजपने बदलले माजी व दिग्गज उमेदवारांना चांगलाच धक्का बसला आहे.
भाजपमधील प्रकाश ढोरे, अर्चना मुसळे या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाटधरत एबी फॉर्म मिळवला, व त्यांच्यासोबत पोर्णिमा रानवडे, विनोद रणपिसे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. भाजपाची उमेदवारी कट झाल्याची समजताच रात्रीच अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे एबी फॉर्म मिळवण्यास हे यशस्वी झाले.
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपचे उमेदवार अमोल बालवडकर यांची उमेदवारी भाजप नाकारल्याने त्यांनी थेट अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेऊन येऊन दुपारी दोनच्या आसपास आपला अर्ज दाखल केला. यामुळे मात्र प्रभाग नऊ मधील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत. या प्रभागात भाजपने लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे यांना उमेदवारी दिली आहे.
तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, राष्ट्रवादीचे पुनम विधाते यांची उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादीने बाबुराव चांदेरे, पार्वती अजय निम्हण, गायत्री मेढे (कोकाटे) अमोल बालवडकर असे उमेदवार दिले आहेत. या बदललेल्या समीकरणामुळे प्रभाग नऊ मधील लढत अटीतटीची होणार असल्याचे लक्षात येत आहे.