Pune Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर शहराध्यक्षावर हल्ल्याचा प्रयत्न

राजकीय तसेच पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा
Pune indapur news
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर शहराध्यक्षावर हल्ल्याचा प्रयत्नPudhari
Published on
Updated on

इंदापूर: इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष शैलेश देविदास पवार उर्फ बाळासाहेब ढवळे (वय 45, रा.सरस्वतीनगर, ता. इंदापूर) यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. राजकीय तसेच पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

याबाबत शैलेश पवार यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास फिर्यादीच्या घराबाहेर शिवीगाळीचा आवाज आला. फिर्यादीने खिडकीतून पाहिले असता दोन पांढर्‍या रंगाच्या मोटारी व त्या समोर चौघेजण उभे असल्याचे दिसले. (Latest Pune News)

Pune indapur news
Pudhari Impact: अनधिकृत फ्लेक्स प्रकरण; ’त्या’ शाळेकडून एक लाखाचा दंड वसूल

फिर्यादी घराबाहेर आल्यानंतर मनोज आनंदकर (रा. वडारगल्ली, इंदापुर), भुषण माने (रा. राजवलीनगर, इंदापुर) व इतर दोन अनोळखी इसमांना शिवीगाळ का करता असे विचारले. यावेळी माने याच्या हातात कोयता होता.

आनंदकर, माने व दोन साथीदार यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अंगावर धावुन जात शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील दोन ते अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावण्यात आली.

Pune indapur news
SSC Result 2025: वडिलांनी मृत्यूला कवटाळले; आईने कष्टाने शिकवले, दुर्गाने मिळवले 86%

हा गोंधळ पाहून फियार्दीचा चुलत भाऊ शुभम निवृत्ती पवार तसेच आइस फॅक्टरीतील कामगार घटनास्थळी आले. त्यांना पाहून वरील चौघेजण कोयता टाकुन मोटारीतून पळुन गेले. पोलिसांनी याप्रकरणी आनंदकर, माने व इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news