Pune Airport
अत्याधुनिक, सांस्कृतिक टर्मिनल पाहून आनंदFile Photo

Pune Airport| अत्याधुनिक, सांस्कृतिक टर्मिनल पाहून आनंद

पुणे विमानतळावर प्रवाशांची प्रतिक्रिया; नवीन टर्मिनलवरील स्वच्छता, कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेबद्दल समाधान

पुणे : आमचा पुणे-दिल्ली-पुणे विमानप्रवास हा ठरलेलाच. पूर्वी आम्ही जुन्या टर्मिनलमधून बाहेर पडायचो. आज पहिल्यांदा लोहगाव येथील नवीन टर्मिनलमधून आलो. अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे टर्मिनल पाहून आनंद झाला.

Pune Airport
IAS Officer Pooja Khedkar| पूजा खेडकरचे पाय खोलात!

जुन्या टर्मिनलपेक्षा अधिक सोयीसुविधा, स्वच्छता येथे पाहायला मिळाली... असे सांगत होत्या रजनी बलदूरकर ! पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल रविवारपासून सुरू झाले. रविवारी येथून १८ विमानांची उड्नुणे झाली, तर सोमवारी (दि. १५) नवीन टर्मिनलमधून ३२ विमानांची उड्डाणे झाली.

नवीन टर्मिनलच्या पहिल्या दिवसाच्या कामाची दै. 'पुढारी'कडून पाहणी करण्यात आली, त्या वेळी प्रवाशांशी संवाद साधण्यात आला. या वेळी यलदूरकर यांनी येथील टर्मिनलच्या पारंपरिक चेहऱ्याविषयी समाधान व्यक्त केले. तसेच, येथे असणाऱ्या स्वच्छतेबद्दल आणि कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेबद्दल देखील समाधान व्यक्त केले.

सुरुवातीला उडाला गोंधळ

पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांना आणण्यासाठी विमानतळावर गेलेल्या अनेक नातेवाइकांना त्यांचे नातेवाईक नक्की कोणत्या टर्मिनलवर येणार आहेत, हे माहिती नसल्यामुळे थोडीशी धावपळ झाली. मात्र, येथे असलेल्या विमानतळ प्रशासन आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यावर त्यांची ही समस्या सुटली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या दोन कंपन्यांच्या विमानांनी येणाऱ्या प्रवाशांना घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक नवीन टर्मिनलला गेले, तर इत्तर कंपन्यांच्या विमानांनी आलेल्या नातेवाइकांना जुन्या टर्मिनलवरून पिकअप करण्यात आले.

Pune Airport
'व्हीआयपी' प्रमुख साहनींच्‍या वडिलांची निर्घृण हत्या

ई-बसची संख्या वाढवण्याची गरज

नवीन टर्मिनलपासून एरोमॉलमध्ये असलेल्या ओला, उबर टॅक्सी थांब्यापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळ प्रशासनाकडून दोन इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांची सामानाच्या बॅगसह सुमारे १ किलोमीटरपर्यंत होणारी पायपीट थांबली आहे. मात्र, सध्या नवीन टर्मिनल येथून फक्त दोनच विमान कंपन्यांची सेवा सुरू आहे. आगामी काळात आणखी विमान कंपन्यांसह जुन्या टर्मिनलचे संपूर्ण कामकाज येथून सुरू होणार आहे. त्यामुळे येथे ई-बसची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले आहे.

आमचा पुणे विमानतळावरून नेहमीच प्रवास होत असतो. जुन्या टर्मिनलमधून प्रवास करताना आम्हाला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असे. तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागे. नवीन टर्मिनलमधून बाहेर पडताना आपण कुठेतरी दुसरीकडेच आलो आहे की काय, असा भास झाला. आम्हाला येथील पारंपरिक पद्धतीची रचना खूप आवडली. तसेच, येथे आमच्यासारख्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांमुळे तर खूपच समाधान वाटत आहे.

दीपाली यलदूरकर, विमान प्रवासी

logo
Pudhari News
pudhari.news