Manchar News: ग्रामीण भागात सध्या रंग वापरलेला भाजीपाला, कडधान्ये विक्रीसाठी येत असून, या केमिकलयुक्त रंगामुळे नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. अन्न व औषध प्रशासनाने सर्वत्र रंग लावलेल्या पदार्थांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
सध्या ग्रामीण भागातही भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. शेतकर्यांच्या शेतीतून येणारा भाजीपाला हा कमी प्रमाणावर असतो, तर व्यापार्यांनी खरेदी करून साठवून परत बाजारात विक्रीसाठी आणणार्या पालेभाज्यांचे प्रमाण अधिक आहे.
सध्या वाटाणा या पिकाबाबत रंगाचा वापर होत असून या रंगांमध्ये अनेक केमिकलयुक्त भाजीपाला असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे दिसण्यासाठी जरी हे वाटाणे हिरवे व चांगले वाटत असले तरीही यापासून होणारा त्रास मात्र खूप मोठ्या प्रमाणावर असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पूर्वी शहरी भागातच अशा प्रमाणावर रंग लावलेले अन्नपदार्थ मिळायचे, परंतु आता ग्रामीण भागातही असे पदार्थ मिळत आहेत. ग्रामीण भागातील आठवडी बाजारामध्ये तसेच किराणा दुकानांमध्ये देखील वाटाणा, पनीर यासारखे पदार्थ मिळतात आणि हे बर्याच प्रमाणात केमिकलयुक्त असतात.
आठवडे बाजारात येणारा वाटाणा हा रंग लावलेला येत असून स्वयंपाक करताना हा रंग सर्व कालवणामध्ये पसरत असून वाटाण्याबरोबर टाकलेल्या बटाट्याला देखील हा रंग लागत आहे. त्याचप्रमाणे हे वाटाणे कितीही वेळा धुतले तरीही त्यांचा रंग हा निघत राहतो. मोठ्या प्रमाणावर यावर केमिकलचा रंग आहे, एका वेळेस धुवून तो जात नाही. त्यामुळे अशा पदार्थांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.