वरवंडला सरपंचपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी; आरक्षण सर्वसाधारण आल्याने चर्चेला उधाण

आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात गट एकत्रित येऊन गावच्या वतीने एकच नाव घोषित करणार का?
Khor News
वरवंडला सरपंचपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी; आरक्षण सर्वसाधारण आल्याने चर्चेला उधाण Pudhari
Published on
Updated on

खोर: वरवंड (ता. दौंड) हे गाव तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ असून, या ग्रामपंचायतीवर 17 सदस्यसंख्या आहे. या गावचे सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण आल्याने अनेक इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व वरवंड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय दिवेकर, पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस तानाजी दिवेकर, कात्रज दूध संघाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक राहुल दिवेकर, विद्यमान उपसरपंच बाळासाहेब जगताप, भीमा-पाटसचे संचालक एम. डी. फरगडे, माजी सरपंच गोरख दिवेकर, माजी उपसरपंच प्रदीप दिवेकर, माजी सरपंच संतोष कचरे, माजी उपसरपंच सागर शेळके, वरवंड ग्रामशिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. विजयकुमार दिवेकर, दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक सचिन सातपुते, वरवंड विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष तुषार दिवेकर, राजेंद्र देशमुख, विद्यमान ग्रा. पं. सदस्य कांतीलाल टेंगले अशा दिग्गज चेहर्‍यांची सरपंचपदाबाबत नावे चर्चेत आहेत.

Khor News
Khed Panchayat Samiti: खेड पंचायत समिती इमारत लवकरच पाडणार; 38 कोटींचा निधी मंजूर

आगामी वरवंड ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत यापैकी नेमके कोणाचे पारडे जड राहिले जाणार, याकडे सर्व तालुक्याचे लक्ष केंद्रित राहिले जाणार आहे. आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात गट एकत्रित येऊन गावच्या वतीने एकच नाव घोषित करणार का? की स्वतंत्र पॅनेल उभा करून समोरासमोर लढत देणार, हे देखील पाहणे तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका असली जाणार आहे.

Khor News
Transport Truck Fire: निगडे मोसे येथे मालवाहतूक गाडी जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

या वर्षापासून प्रथमच जनतेमधून थेट सरपंच निवडला जाणार असल्याने गावचा भविष्यातील सरपंच निवडण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागली जाणार का? दौंड तालुक्यात वरवंड गाव राजकीय पटलावर अग्रगण्य गाव म्हणून नेहमीच ओळखले जात आहे. येथील राजकीय समीकरणांचा नेहमीच तालुक्याने आदर्श घेतला आहे. येणार्‍या निवडणुकीत ही समीकरणे पुन्हा तालुक्यात आदर्श ठरतात का? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news