Ashadhi wari 2023 : सणसरकरांकडून वारकर्‍यांची मनोभावे सेवा

Ashadhi wari 2023 : सणसरकरांकडून वारकर्‍यांची मनोभावे सेवा
Published on
Updated on

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या सेवेसाठी सणसरकर धावून आले आहेत. एखादा सण असल्याप्रमाणे सणसरकरांनी वारकर्‍यांची सेवा केली. भवानीनगर येथे डॉ. राकेश मेहता, वैभव पवार, महेश माने, सचिन भोसले, सोनू टकले यांच्या वतीने 1 हजार 200 वारकर्‍यांना मोफत अन्नदान करण्यात आले. सामाजिक सलोखा राखण्यासाठी मुस्लिम समाजाच्या महिलांनी भाकरी तयार करून दिल्या. सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला.

यशश्री हॉस्पिटलच्या वतीने दर वर्षीप्रमाणे वारकर्‍यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. सणसर येथे मुस्लिम समाजाच्या मुस्लिम सामाजिक विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मसाला दूध, फळे व फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. या वाटपाचा शुभारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

श्री छत्रपती कारखान्याचे संचालक अ‍ॅड. रणजित निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, सरपंच पार्थ निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य यशवंत पाटील आदी उपस्थित होते. शब्बीर काझी, इक्बाल शेख, आपाक मुलाणी, हमीद तांबोळी, हनिफ तांबोळी, अमीर पठाण, राजू पठाण, इकबाल काझी,

हुसेन काजी, हाजी हसन शेख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात. या वर्षी 2 हजार वारकर्‍यांना 20 क्रेट केळी, उपवासाचा चिवडा व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. श्री छत्रपती कारखान्याच्या वतीने 5 हजार वारकर्‍यांना बुंदीच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. दिलीप सोमनाथ शिंदे व नानासो झगडे यांच्या संस्कार हॉटेलच्या वतीने 2 हजार वारकर्‍यांना जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. श्री छत्रपती हायस्कूलच्या दहावीच्या 2015/16 च्या बॅचच्या वतीने वारकर्‍यांना 60 किलो पोह्याचे वाटप करण्यात आले.

अविनाश काटकर यांच्या आर्या गुळाचा चहा या हॉटेलच्या वतीने वारकर्‍यांना 500 लिटर गुळाचा मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. श्री छत्रपती कारखान्याचे संचालक गणेश झगडे यांच्या गणेश क्लॉथ सेंटरच्या वतीने 1 हजार वारकर्‍यांना अन्नदान करण्यात आले.
अक्षय काटकर, शरद पवळ, साईराज पवळ, जयवर्धन भोईटे व जय हनुमान गणेश तरुण मंडळाच्या वतीने साईनगर येथे वारकर्‍यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह निंबाळकर व शंकर बबन सोनवणे यांच्या वतीने वारकर्‍यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी वारकर्‍यांना मोफत पाण्याचे टँकर भरून देण्यात येत होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news