गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असदचे पुणे, नाशिकमध्ये वास्तव्य

गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असदचे पुणे, नाशिकमध्ये वास्तव्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशभरात गाजलेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असद एनकाउंटरपूर्वी फरार कालावधीत पुण्यात आणि नाशिकमध्ये वास्तव्य करून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुरुवारी असदचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. मात्र, तत्पूर्वी दीड महिने दोघेही पसार असताना त्यांना पुणे आणि नाशिकमध्ये काही दिवस राहण्यासाठी गुंड अबू सालेम याच्या शार्पशूटरनी मदत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, पुणे पोलिसांकडून याची खातरजमा करण्यात येत आहे. मात्र, याप्रकराबाबत पुणे पोलिसांनी दुजोरा दिला नाही. उत्तर प्रदेशातील आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची गँगस्टर असद आणि त्याचा शार्पशूटर गुलाम यांनी हत्या केली होती. त्यानंतर मागील दीड महिन्यांपासून ते पोलिसांना चकमा देत गायब झाले होते. त्यांना वाचविण्यासाठी गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद प्रयत्न करीत होते. दरम्यान, त्यांच्या पुण्यासह नाशिकमधील वास्तव्याविषयी आता पुणे पोलिसांकडून खातरजमा करण्यात येत आहे. दरम्यान या गुन्ह्याच्या अनुषंगाने उत्तर प्रदेश पोलिसदेखील महाराष्ट्र पोलिसांच्या संपर्कात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news