

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: मोगर्याच्या फुलांच्या गजर्याची आवड नसणारी महिला विरळाच. कोणताही सण-समारंभ असो, गजर्याशिवाय तो महिलांना अपूर्णच वाटतो. सध्या बाजारात सुगंधी फुलांच्या गजर्यासारखे दिसणारे नकली प्लास्टिकच्या फुलांचे गजरे बाजारात मिळत आहे. फुलांचे गजरे काही वेळानंतर सुकून जातात; मात्र नकली गजरे कायम टवटवीत दिसत असल्याने या गजर्यांना महिलांकडून पसंती मिळत आहे.
फुलांच्या गजर्याचे भाव सध्या परवडणारे नाहीत; मात्र नकली गजरे थोडे महाग असले तरी तो कायम टवटवीत दिसत असल्याने बाजारात नकली गजरार्याला आधिक मागणी वाढली आहे. फुलांच्या गजर्याप्रमाणे प्लास्टिकपासून तयार केलेले गजरे बाजारात विविध रंगात उपलब्घ आहेत. नकली गजरा हा कापड, प्लास्टिक या पासून तयार केला जातो. तसेच त्यामध्ये विविध रंग देखील आहेत.
पांढरा, लाल, गुलाबी, पिवळा हिरवा, भगवा अशा अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे हे गजरे दिसायला खूप मोहक वाटतात. या गजर्याचा वापर रोज करू शकतो, अधिक काळ टिकतो. त्यामुळे महिलावर्गाकडून याला अधिक पसंती दिली जात आहे.
नकली गजर्याप्रमाणे बाजारात प्लास्टिकच्या फुलांच्या हारांना पसंती दिली जात आहे. हे हार जाड प्लास्टिकपासून तयात केले जातात. यामध्ये मोठा आकाराचा हार, लहान हार, मध्यम हार असे हार उपलब्ध आहेत. नकली गजरा हा असली गजर्याच्या तुलनेत अधिक काळ टिकतो. तसेच असली गजरा हा दोन दिवसदेखील ताजा राहत नाही. लगेच खराब होतो. दररोजच्या वापरात नकली गजर्याचा वापर करू शकतो, असे सिद्धी पवार म्हणाल्या.
हेही वाचा: