रेल्वेची मनमानी; दौंड-पुणे प्रवासी त्रस्त !

रेल्वेची मनमानी; दौंड-पुणे प्रवासी त्रस्त !

दौंड : रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे दौंड -पुणे – दौंड रेल्वे मार्गावर दररोज प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. दौंड – पुणे या लोहमार्गाचे आठ वर्षांपूर्वी विद्युतीकरणाचे काम झाले. परंतु, अद्याप इलेक्ट्रिक लोकल सुरू होऊ शकली नाही. त्यातच गेल्या महिन्याभरापासून लोकल गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दुपारी व सायंकाळी येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एक व चार हे क्रमांक दोनपासून लांब असल्याने प्रवाशांना धावपळ करावी लागते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news