

पुढारी ऑनलाईन : शरद पवार यांचा फोटो दाखवून मत घ्या असे कधीही म्हंटलो नाही. अजुन निवडणुकाच नाहीत तर मग मते कोठून मागणार असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भूजबळ म्हणाले. अभिषेक मनु सिंघवींच्या युक्तीवादावर भूजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी जे वाक्य बोललोच नाही ते मी बोललो म्हणून सांगितले जात आहे हे चुकीचे आहे असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंर एकही निवडणूक झालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारे मते मागितल्याच बोललं जात आहे. मात्र मी असे कधीच म्हणालो नाही. कोर्टाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक आयोगान आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिल आहे.
कांद्याच्या दराबाबत बोलताना, कांद्याचे भाव शरद पवार कृषीमंत्री असताना सुद्धा पडले होते. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी काद्याला का हमीभाव दिला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :