पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सत्तांतरानंतर मनसे सक्रीय झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे ग्रामीण – मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक केली आहे. निवडीचे पत्र आज (दि. २२) प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी किशोर शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते, शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी अजय शिंदे, बाळा शेडगे यांची नियुक्ती केली आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?