पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी करा ऑनलाइन अर्ज; 1 जून 2025 पर्यंत अर्ज स्वीकारणार

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.
Animal Husbandry Department
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी करा ऑनलाइन अर्ज; 1 जून 2025 पर्यंत अर्ज स्वीकारणारPudhari News Network
Published on
Updated on

पुणे: पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी 1 जून 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत.

नावीन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गायी-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे. (Latest Pune News)

Animal Husbandry Department
शरद पवार अन् गौतम अदानी यांची विद्यापीठात अनौपचारिक भेट

इच्छुकांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा ’एएच.एमएएचएबीएमएस’ मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज करावा. अर्ज करताना दुग्धव्यवसाय, कुक्कटपालन किंवा शेळीपालन यापैकी स्वतंत्रपणे निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्ज भरताना नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरच अर्जाच्या स्थितीबाबतचे संदेश पाठविले जाणार असल्याने अर्जदाराने कोणत्याही स्थितीत मोबाईल क्रमांक बदलू नये. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती, याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध आहे.

Animal Husbandry Department
Pune: ‘स्वच्छ पुणे सुंदर पुणे’ फक्त कागदावरच; पालिकेच्या घंटागाड्या फिरत नसल्याने उपनगरांत सर्वत्र कचर्‍याचे ढीग

या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक बदलणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

दरम्यान, अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

“पशुसंवर्धन योजनेच्या लाभासाठी अर्जदाराने एखाद्या योजनेकरिता एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांपर्यंत लागू ठेवण्याची सोय केलेली आहे. त्यामध्ये 2021-22 पासून पुढील पाच वर्षे म्हणजे 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याचा प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, ही माहिती कळू शकेल. साहजिकच, त्यांना लाभार्थी हिस्सा रक्कम भरणे किंवा इतर बाबींचे नियोजन करता येणे शक्य आहे.

डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन आयुक्त, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news