Anganwadi Classes In ZP Schools: 2026-27 पासून जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षण शाळांशी जोडण्याची प्रक्रिया; जिल्हा परिषदांना शासनाच्या सूचना
Pre School
Pre SchoolPudhari
Published on
Updated on

पुणे: शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील सुस्थितीत असलेली खोली अंगणवाडीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Pre School
Farm Labour Women Heatwave: उन्हाच्या तडाख्यात शेतमजूर महिलांचे हाल; 300 रुपयांत संसार चालवताना कसरत

राज्यात 1 लाख 10 हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Pre School
Baramati Heatwave: बारामतीत वाढत्या उष्णतेचा कहर; नागरिक, शेतकरी आणि जनावरेही उकाड्याने त्रस्त

त्यामुळे अंगणवाडीतील 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी आधारशीला बालवाटिका 1, आधारशीला बालवाटिका 2, आधारशीला बालवाटिका 3 या अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील बहुतांश अंगणवाड्या या शाळांपासून वेगळ्या आहेत. त्यामुळे आता अंगणवाड्यांना शाळांशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Pre School
Illegal Fetal Determination Racket: केडगावातील गर्भलिंगनिदान रॅकेटची खळबळजनक चर्चा; अपहरण, खंडणी आणि व्हिडीओ क्लिप्समुळे खळबळ

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे.

Pre School
Ranjangaon MIDC Police Firing: रांजणगाव एमआयडीसी परिसरात पोलिसांवर गोळीबार; सराईत गुन्हेगार शेखर जाधव उसाच्या शेतातून फरार

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीनुसार भविष्यात पूर्वप्राथमिकचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडावे लागतील. मात्र, बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाड्या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news