Amit Shah Pune Visit: अमित शाह यांच्या दौऱ्याआधी पुण्यात पोलिसांची कारवाई; युवक काँग्रेस अध्यक्षाला घेतले ताब्यात

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Maharashtra Police
Maharashtra PoliceFile Photo
Published on: 
Updated on: 

Amit Shah Pune Visit

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान निषेध आंदोलन करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली, असा दावा उमेश पवार यांनी केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजप सरकारचा निषेध केला आहे. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील, अशी भूमिका उमेश पवार यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra Police
IndiGo Pune Flight: टेकऑफनंतर इंडिगोच्या विमानाचे लँडिंग गिअर अडकले; पुणे विमानतळावर खळबळ, आणीबाणी घोषित; नेमकं काय घडलं?

अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त आज, उद्या वाहतूक बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त रविवारी (१५ नोव्हेंबर) आणि सोमवारी (१६ नोव्हेंबर) सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

'लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी, मुंढवा या रस्त्यावर रविवारी आणि सोमवारी सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड, जहाँगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरिअल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील शादलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता, ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली.

सोमवारी (१६ नोव्हेंबर) अमित शहा यांचा सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्ताने कार्यक्रम संपेपर्यंत सोमवारी सकाळी ९ नंतर टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल, पेरूगेट पोलिस चौकी ते पावन मारुती मंदिर, भरत नाट्य मंदिर परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ७ नंतर किराड चौक ते नेहरू मेमोरिअल हॉल चौक मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी किराड चौक येथून जीपीओमार्गे हॉटेल ब्लू नाईल चौकात जावे. तेथून इच्छितस्थळी जावे. पुणे जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी मॉल ते हॉटेल ब्लू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलिस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्कॉन मंदिर, ब्लू नाईल चौक येथे वाहने लावावीत, असे आवाहन वाटवक पोलिसांनी केले आहे.

Maharashtra Police
Pune Bengaluru Greenfield Expressway | नवा पुणे - बंगळूर ‘ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे’ मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.