Pune Bengaluru Greenfield Expressway | नवा पुणे - बंगळूर ‘ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे’ मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

Pune Bengaluru Greenfield Expressway |
Pune Bengaluru Greenfield Expressway | नवा पुणे - बंगळूर ‘ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे’ मंजुरीच्या अंतिम टप्प्यातPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

संतोष बामणे

जयसिंगपूर : सध्या असलेल्‍या पुणे-बंगळूर महामार्गावरील ताण कमी करण्यासाठी नवा पुणे-बंगळूर ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आला आहे. हा मार्ग ७०० हून अधिक किलोमीटरचा असून यासाठी तब्बल ५० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील तीन जिल्हे व कर्नाटकातील ९ जिल्ह्यांतून जाणार आहे. यासाठी २१ हजार एकरहून अधिक जमीन संपादित करावी लागणार असून हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटच्या आर्थिक मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

पुणे-बंगळूर महामार्ग (कोल्हापूर-बेळगाव मार्गे) यावरील वाहतुकीचा ताण, महापूर व पाऊसकाळातील समस्या, अपघाताच्या वाढत्या घटना, वाहतूक कोंडी, लागणारा जादा वेळ यामुळे नव्या पुणे-बंगळूर ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेला गती मिळाली आहे. नव्याने होणाऱ्या या मार्गासाठी सात ते आठ तासांत हा प्रवास होण्याचे धोरण आहे.

`भारतमाला व्हिजन २०४७` मधील मास्टर प्लॅनमध्ये होणारा हा मार्ग नव्याने वर्ग करण्यात आला आहे. याचा डीपीआर तयार झाला असून जमिनीचे संपादन व पर्यावरण विभागाच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या अंतिम आर्थिक मंजुरीनंतरच याचा डीपीआर होणार आहे. विशेषत: हा होणारा मार्ग कोरड्या व दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांतील भागातून जाणार आहे.

पुण्यातील वर्वे कंजाळे येथून मार्गाची सुरुवात

पुणे जिल्ह्यातील वर्वे कंजाळे येथून या मार्गाची सुरुवात होणार असून भोर, पुरंदर या तालुक्यातून निरा नदी ओलांडणार आहे. सातारा : खंडाळा (पारगाव), फलटण, माण, खटाव. सांगली : खानापूर (विटा), तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज (महाराष्ट्र हद्दीपर्यंत), कर्नाटक : बेळगाव, अथणी, रामदुर्ग, बागलकोट-जमखंडी, मुधोळ, गदग-नरगुंद, कोप्पळ-यलबर्गा, ककनूर, विजयनगर-होसपेट, कुरीर्गी, दावणगिरे-जगलूर, चित्रदुर्ग, तुमकूर-सिरा, मधुगिरी, कोर्टागिरी, बंगळूर (ग्रामीण)-डोड्डाबळ्ळापूर, नेलमंगला येथून पुढे बंगळूरच्या सॅटलाईट रिंग रोडला हा मार्ग मिळणार आहे.

महत्त्वाची कामे

उड्डाणपूल ५५, इंटरचेंजेस २२, रेल्वे उड्डाणपूल ६, महामार्ग चौफुले १४, अपघातकालीन हवाई धावपट्टी २, निरा, कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा यासह १२ हून अधिक नद्यांवर पूल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.