Manchar News: आंबेगावात 5 गट, 10 गण ‘जैसे थे’च

जि. प. आणि पं. स.मध्ये महायुती आणि आघाडीचे यश जागावाटपांच्या गणितांवरच
Local Bodies Elections
जिल्हा परिषद गट-गणरचनेत प्रस्थापितांना धक्का; खेड तालुक्यात प्रचंड तोडफोडPudhari
Published on
Updated on

मंचर: आंबेगाव तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गण ‘जैसे थे’ च राहिले आहेत. भविष्यात निवडणुका जाहीर होतील. त्या वेळी तालुक्यात राजकीय धुमश्चक्री होईल. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांची अंतर्गत जागावाटपाची गणिते जुळतील का, यावरच यश अवलंबून आहे.

सद्य:स्थितीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीत आहेत. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीचे यश हे जागावाटपावरच अवलंबून असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यावरच तालुक्यातील नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. (Latest Pune News)

Local Bodies Elections
Railway Accident Tracking: रेल्वे अपघातांतील चुकांचे आता होणार ‘ट्रॅकिंग’; अपघाताला दोषी कोण? हे लगेच समजणार

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गणांची संख्या पूर्ववत झाली आहे. नगरपंचायत झाल्याने मंचर शहर बाहेर पडले आहे. त्यामुळे पूर्वीच्या गट आणि गण रचनेत काही प्रमाणात फेरबदल झाले आहेत. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बधून तयार असलेल्या इच्छुकांची निवडणूक तारीख जाहीर होण्याकडे लक्ष लागले आहे.

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांची आणि पंचायत समितीच्या दहा गणांची प्रारूप प्रभागरचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केली. या प्रभागरचनेवर दि. 21 पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. तालुक्यात मंचर येथे नगरपंचायत अस्तित्वात आल्याने मंचर शहर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडले आहे.

Local Bodies Elections
PWD Akhad Party: पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागात ऑफिस वेळेत ‘मटण पार्टी’; कामकाज ठप्प, जनता त्रस्त

पंचायत समितीचे गण व त्यातील समाविष्ट गावे

बोरघर गण : आहुपे, पिंपरगणे, आघाणे, तिरपाड, डोण, न्हावेड, नानवडे, पाटण, पिंपरी, साकेरी, महाळुंगे तर्फे आंबेगाव, आसाणे, मेनुबरवाडी, माळीण, आमडे, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द, दिगद, मेघोली, कोंढरे, पंचाळे बुद्रुक, पंचाळे खुर्द, अडिवरे, वचपे, बोरघर, आंबेगाव, वरसावणे, फुलवडे, महाळुंगे तर्फे घोडा, कानसे, सुपेधर, चपटेवाडी, गंगापूर बुद्रुक, गंगापूर खुर्द, आपटी, आमोंडी, फलकेवाडी.

शिनोली गण : शिनोली, फदालेवाडी /उगलेवाडी, पिंपळगावतर्फे घोडा, पोखरकरवाडी, डिंभे खुर्द, मापोली, गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, डिंभे बुद्रुक, कोलतावडे, कळंबई, राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, नांदुरकीचीवाडी, तळेघर, फलोदे, सावरली, राजपूर, गाडेवाडी, कोंढवळ, निगडाळे, तेरुंगण.

घोडेगाव गण : घोडेगाव, आंबेगाव गावठाण, कोलदरा-गोनवडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, चिंचोली, नारोडी, गिरवली, रामवाडी, काळेवाडी-दरेकरवाडी, गवारवाडी, ढाकाळे, आंबेदरा, साल, तळेकरवाडी.

पेठ गण : पेठ, श्रीरामनगर, कारेगाव, भावडी, चिंचोडी, शेवाळवाडी-लांडेवाडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, पिंगळवाडी-लांडेवाडी, कोळवाडी-कोटमदरा.

कळंब गण : ठाकरवाडी, चास, कडेवाडी, महाळुंगे पडवळ, माळवाडी, ठाकरवाडी, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, साकोरे, नांदूर, लौकी, कळंब.

चांडोली बुद्रुक गण : चांडोली बुद्रुक, खडकी, भराडी, थोरांदळे, नागापूर, जाधववाडी, रांजणी, वळती, भागडी.

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गण : शिंगवे, निरगुडसर, मेंगडेवाडी, जवळे, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, काठापूर बुद्रुक.

जारकरवाडी गण : पोदेवाडी, लोणी, वाळूजनगर, खडकवाडी, लाखणगाव, देवगाव, जारकरवाडी, रानमळा, धामणी, पहाडदरा. वडगावपीर, मांदळेवाडी, शिरदाळे.

पिंपळगाव तर्फे महाळुंगे गण : वडगाव काशिंबेग, वाळूजवाडी, एकलहरे, सुलतानपूर, तांबडेमळा, शेवाळवाडी, निघोटवाडी, पिंपळगाव तर्फे महाळुंगे, टाव्हरेवाडी, चांडोली खुर्द.

अवसरी बुद्रुक गण : अवसरी खुर्द, खडकमळा, शिंदेमळा, भोरवाडी, वायाळमळा, पारगाव तर्फे खेड, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news